सिन्नर (जि. नाशिक) : मुसळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे आता तहसील कार्यालयामागील असलेल्या स्वतंत्र व अध्ययवत सुविधायुक्त इमारतीत शनिवारपासून (ता.१) नुकतेच स्थलांतर झाले आहे. पोलिस ठाण्याचा कारभार आता या इमारतीतून सुरू झाले आहे. (MIDC Police Station now near Sinnar Tehsil Nashik News)
सात वर्षांपूर्वी वावी व सिन्नर ठाण्याच्या हद्दीतील काही गावांचा समावेश करुन स्वतंत्र एमआयडीसी पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. या ठाण्याचे कार्यालय मुसळगाव येथील औद्योगिक वसाहतीतील स्टाईसच्या मालकीच्या व्यापारी संकुलात भाडोत्री होते.
पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीलगत पूर्व भागातील उजनी, दहिवडीपासून ते पश्चिम भागातील भागातील नायगाव, जायगाव, देशवंडी या गावांचा समावेश आहे. ठाण्याच्या हद्दीत नाशिक-शिर्डी महामार्गाच्या उत्तर बाजूस असणाऱ्या गावांचा समावेश केलेला आहे.
बारागाव पिंप्री, नायगाव, जायगाव या गावातील नागरिकांना पोलिस ठाण्याच्या कामकाजासाठी मुसळगावला यावे लागत होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. त्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन व नागरिकांचे हित लक्षात घेऊन सिन्नरमध्ये स्वतंत्र इमारतीचे बांधकाम करण्यात आले.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
शनिवारपासून मुसळगाव येथील पोलीस ठाण्याचे कामकाज बंद करुन सिन्नर येथील स्वतंत्र इमारतीमध्ये कामकाज सुरु झाले आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ४० गावांचा समावेश असून चार बीट आहेत.
४० ते ४५ पोलिस सेवक कार्यरत आहे. त्यामुळे मुसळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गावातील नागरिकांनी त्यांच्या विविध कामकाजासाठी आता सिन्नर येथील नूतन इमारतीतील पोलिस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक श्यामराव निकम यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.