Milk  esakal
नाशिक

Nashik Milk Rate: जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटात; मागणी घटल्याने महिनाभरात दर घसरले

सकाळ वृत्तसेवा

Nashik Milk Rate : शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा बसलेला असताना जिल्ह्यातील दूध उत्पादकही अडचणीत सापडले आहेत. महिनाभरात गायीच्या दुधाचे दर दहा रुपयांनी घसरून २७ रुपये लिटरवर आले आहेत.

दुधाचा खर्चही भरून निघत नसल्याने दूध उत्पादकांना आता शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे. (Milk prices fell by Rs 10 per month due to reduced demand nashik news)

जिल्ह्यात दूध संकलन केंद्रामार्फत दीड लाख लिटरपर्यंत गायीच्या दुधाचे संकलन होते. यातील साधारणत: ५० हजार लिटर दूध घरगुती वापरात येते. तर १५ ते २० हजार लिटर दूध हॉटेलसाठी लागते. मिठाई बनवण्यासाठी ३० हजार लिटरपर्यंत दूध उपयोगात येते. याव्यतिरिक्त दुधाची पावडर बनवली जाते.

या पावडरला साधारणत: ३०० रुपये किलो भाव मिळतो. पण गेल्या काही महिन्यांत हा भाव १९० रुपयांपर्यंत घसरल्याने दुधाचे दर घसरले आहेत. थंडी व दुष्काळामुळे आईस्क्रीमची मागणी कमालीची घटल्याने दूध पावडरची मागणी घटली.

बहुतांश दूध संघांनी या पावडरचा साठा करून ठेवला आहे. पण दुधाचा पुरवठा कायम असल्याने दिवसेंदिवस दर घटत आहेत.

त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये प्रचंड असंतोष असून, शासनाने उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

खर्चही निघणे अवघड

एका गायीला आठ किलो खाद्य लागते. त्याशिवाय ६० किलो चारा द्यावा लागतो. या दोन्हींचा खर्च साडेपाचशे रुपयांपर्यंत पोचतो. त्यामुळे गायीच्या एक लिटर दुधासाठी २५ ते ३० रुपये खर्च येतो. हा खर्चही भरून निघणे अशक्य आहे. दूध उत्पादकांना आता मजुरी म्हणून फक्त शेण मिळते.

"दुष्काळामुळे जोडव्यवसाय म्हणून बहुतांश शेतकरी दूध व्यवसायाकडे वळले आहेत. दिवसेंदिवस दर घसरत असल्याने उत्पादकांचे प्रचंड नुकसान होत आहे. याकडे राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे." -विठ्ठल आव्हाड, दूध उत्पादक, सिन्नर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT