नाशिक : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली राहावी, यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. त्यांना चांगले आरोग्य लाभो अशी प्रतिक्रिया राज्याचे खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी आज (ता.२२) नाशिकमध्ये व्यक्त केली. (Mining Minister Dada Bhuse Statement about Uddhav Thackeray nashik Latest political News)
शहरातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेत पालकमंत्री भुसे आले होते. त्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे यांच्या प्रकृती बद्दल त्यांना विचारले असता त्यांनी मत व्यक्त केले. विविध प्रश्नांना उत्तर देताना भुसे म्हणाले, सन २०१७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विकास आराखडा तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. किसान रेल्वे सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल.
महापालिकेच्या म्हाडा सदनिका घोटाळ्याची माहिती मागवून बेकायदा उत्खनन प्रकरणाची चौकशी केली जाईल. अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निफाड ड्रायपोर्ट, जिल्हा परिषदेचे शाळांना रोजगार हमी योजनेंतर्गत कंपाउंड करणे, पाणी वळण योजना, पाटबंधारे प्रकल्पांचा अहवाल सादर करणे, कार्गो वाहतूक व्यवस्था, नाशिक- पुणे रेल्वे तसेच सुरत- चेन्नई महामार्ग, अंगणवाडी यांना सुविधा पुरविणे हुतात्मा स्मारकांची दुरुस्ती याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री भुसे यांनी दिली.
देशपातळीवर नाशिकचे ब्रँडिंग
नाशिकमध्ये नवीन उद्योगांना आकर्षित करण्यासाठी जागेसह विविध सवलती देण्याचा प्रयत्न राहणार असून त्यासाठी नाशिकचे ब्रँडिंग केले जाणार आहे. कृषी आरोग्य व शिक्षण तसेच रोजगार या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नाशिक एज्युकेशन हब बनविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
भाजप आमदारांशी विचार विनिमय
महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह खासदार हेमंत गोडसे माजी नगरसेवक व शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, श्याम कुमार साबळे उपस्थित होते. शहरात भाजपचे तीन आमदार असताना एकही आमदार उपस्थित नसल्याने या प्रश्नावर बोलताना भाजपचे आमदार माझ्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात असल्याची पुष्टी त्यांनी जोडली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.