Minister Balasaheb Thorat welcome by MLA saroj Ahire esakal
नाशिक

Nashik : देवस्थान नावाचा फास अखेर सुटला

विनोद बेदरकर

नाशिक : देवळाली विधानसभा मतदारसंघातील (Deolali Assembly constituency) तीन गावातील शेत जमिनीवरील देवस्थानची नावे रद्द करण्याचा निर्णय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी दिल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे विहितगाव, बेलतगव्हाण, मनोली या गावातील हजारो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाला. तिन्ही गावातून तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल होत्या, मंत्री थोरात यांच्याकडे सुनावणी होऊन हा निर्णय देण्यात आला. (Minister Balasaheb Thorat decided to cancel names of temples on farm land in 3 villages Nashk news)

देवळाली मतदारसंघातील सर्वात जुन्या व प्रलंबित प्रश्नावर आमदार आमदार सरोज अहिरे, नाशिक रोड देवळाली बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष बाबूराव मोजाड यासह सोसायटी व अनेकांनी प्रयत्न केले. गुजरात देवस्थान खालसा कायदा व अतिरिक्त सचिव समितीच्या सुनावणीत मंगळवारी (ता.२८) सकाळी मंत्रालयात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणाची सुनावणी दरम्यान शेतक-यांच्या बाजूने निकाल देत उताऱ्यावर देवस्थानच्या नावाची नोंद बेकायदेशीर ठरवत रद्द केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सोबत अनेकदा बैठका घेण्यात झाल्या.

असे होते बाधित क्षेत्र

विहितगाव २११.९७ हेक्टर

बेलतगव्हाण २९१ हेक्टर

मनोली ३५० एकर

"माझ्यासाठी सर्वात भावनिक व आनंदाचा क्षण आहे. मतदार संघातील हजारो शेतक-यांच्या घरात आज पन्नास वर्षानंतर दिवाळी साजरी होत आहे. शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करुन प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान लाभत आहे." - सरोज आहिरे, आमदार देवळाली.

"चुकून झालेल्या नोंदीने पन्नास वर्षांपासून शेतक-यांना त्रास झाला, त्यावेळेच्या अधिका-यांनी सरकारी परिपत्राच्या आधारे गैरसमजातून नोंद टाकली होती. यावर शेतक-यांनी अपील दाखल केले होते, शेतक-यांना न्याय मिळाला." - निवृत्ती अरिंगळे, अपिलकर्ते, नाशिकरोड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT