येवला : आकाशात झेपावणारे पतंग हे अधिक उंचावर गेले पाहिजे. हे सर्व आपल्यालाच लोकांचे पतंग आहेत. हे पतंग कापण्याचा प्रश्नच येत नाही.
मात्र येणाऱ्या निवडणुकीत आपल्या समोर जे विरोधक असतील त्यांचा पतंग या मतदारसंघातील जनतेच्या बळावर नक्कीच कापू, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. (Minister Chhagan Bhujbal brought joy of kite festival yeola nashik )
मकरसंक्रांतीनिमित्त येथे आयोजित पतंग उत्सवात मंत्री बळ यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल परदेशी यांच्या निवासस्थानी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला. उपस्थित नागरिकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
भुजबळ म्हणाले की, गेल्या निवडणुकांमध्ये अनेक लोक आपल्या विरोधात उभे राहिले होते. येवल्याच्या जनतेने मात्र त्यांचा दोर कापला आहे. येणाऱ्या निवडणुकीत ज्यांची इच्छा आहे, त्यांनी विरोधात लढावं.
मतदारसंघातील जनता त्यांना घरचा रस्ता दाखवेल, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. तसेच जनतेच्या विश्वासाचा धागा पक्का असल्याने माझा धागा कायम राहणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दीपक लोणारी, माजी पंचायत समती सदस्य मोहन शेलार, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, मकरंद सोनवणे, अल्केश कासलीवाल, सुनील पैठणकर, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, सुभाष गांगुर्डे, गोटु मांजरे, सुमित थोरात, विशाल परदेशी, सचिन सोनवणे, गणेश गवळी आदी उपस्थित होते.
चित्र रेखाटलेला पतंग भेट
मकर संक्रातीनिमित्त येथील कार्यालयात मंत्री भुजबळ यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तीळगुळ वाटप करत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी चित्रकार संतोष राऊळ यांनी भुजबळ यांना त्यांचे चित्र रेखाटलेला पतंग भेट दिला.
शिवसृष्टी प्रकल्प कामाची पाहणी
शहरात साकारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी करत येत्या एप्रिलपर्यंत काम पूर्ण करा, अशा सूचना भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांचा इतिहास सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावा, या दृष्टीने शिवसृष्टी प्रकल्प हा अतिशय महत्त्वाचा आहे. यासाठी सुमारे अकरा कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे. प्रकल्पाची कामे एप्रिल २०२४ पूर्वी तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.