bhagwat karad  
नाशिक

Nashik News: देशावरचे कर्ज किती? तर अर्थ राज्यमंत्री म्हणतात, ‘पाहून सांगतो’

पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू असल्याचे कराड यांनी सांगितल्यावर त्यांना ‘देशावर कर्ज किती?’ याबद्दल विचारल्यावर ‘पाहून सांगतो,’ असे ते म्हणाले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित विकसित भारत संकल्प अभियान रथयात्रेला नागरिकांचा, योजना फसव्या असल्याने विरोध होत असल्याच्या प्रश्‍नावर संतप्त झालेल्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी महाविकास आघाडीचे लोक सहन होत नसल्याने विरोध करीत असल्याचा आरोप केला.

पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू असल्याचे कराड यांनी सांगितल्यावर त्यांना ‘देशावर कर्ज किती?’ याबद्दल विचारल्यावर ‘पाहून सांगतो,’ असे ते म्हणाले. (Minister of State for Finance bhagwat karad could not give answer about loan on country nashik news)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारतर्फे शहरी भागातील १८ व ग्रामीण भागातील १७ अशा एकूण ३५ योजनांची माहिती, लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी देशभरात विकसित भारत संकल्प अभियान रथयात्रा आयोजित केली आहे. देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या उद्देशाने जनजागृतीचा भाग म्हणूनही या यात्रेकडे पाहिले जात आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराड हे अभियान रथाची माहिती देण्यासाठी नाशिकमध्ये आले.

त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी भाजपच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी केंद्र सरकारशी संबंधित विविध प्रकारची माहिती दिली. ते म्हणाले, की २०१४ पूर्वी भ्रष्टाचाराची लागण झालेल्या देशात साडेनऊ वर्षांत चांगले काम झाल्याने जगात देशाची चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. २०१४ पूर्वी देशात आतंकवाद होता, तो संपला. भारताला गरिबांचा देश म्हटले जायचे. आता विकसित होणारे राष्ट्र म्हणून उदयाला येत आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन होत आहे.

सुटसुटीत करप्रणालीमुळे चांगल्या प्रकारे करसंकलन होत आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांना लाभ मिळावा, यासाठी विकसित भारत संकल्प अभियान राबविले जात आहे. देशभरात योजनांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी तीन हजार रथ तयार करण्यात आले आहेत.

या माध्यमातून मोदींची विकासाची गॅरंटी आम्ही देत आहोत. २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवायचे आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील योजनांमुळे विकास दर वाढला आहे. देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली आहे. पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था झाल्यास जपान, जर्मनीपेक्षा अधिक पुढे जाऊ.

कधी सारवासारव, तर कधी ‘यू टर्न’

- देशाचा विकास दर वाढला, पाच ट्रिलियनकडे वाटचाल होत असताना ‘देशावर कर्ज किती?’ या प्रश्‍नावर अर्थ राज्यमंत्री कराड काहीशे संतापले. ते म्हणाले, ‘पाहून सांगतो.’ मात्र, कर्ज फेडण्याची क्षमता देशाकडे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

- ३३ सरकारी कंपन्या विकल्याने विकास दर वाढला का? या प्रश्‍नावरही त्यांनी संतापूनच उत्तर देताना पब्लिक सर्व्हिस युनिट (पीएसयू)मध्ये धोरणात्मक (स्ट्रॅटेजिक) व धोरणात्मक नसलेले (अनस्ट्रॅटेजिक)पैकी धोरणात्मकदृष्ट्या गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

- यात्रेचे स्वागत होत असल्याचा दावा कराड यांनी केला असला, तरी गावांमध्ये रोषाला सामोरे जावे लागत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढण्याची वेळ आली. रोषाचे कारण काय? यावर महाविकास आघाडीचे लोक विरोध करीत असतील, असे उत्तर त्यांनी दिले.

- सर्वसामान्य लोकांना महाविकास आघाडीचे लोक आपण म्हणतात का? यावर त्यांनी नाही, असे उत्तर देताना योजना समजण्यासाठी रथयात्रा असल्याचे सांगितले. २५ टक्के लोकांना फायदा झाला तरी पुष्कळ अशी जोड त्यांनी दिली.

- २०१४ पूर्वी देश असुरक्षित होता, आतंकवादी हल्ले व्हायचे. आता देश सुरक्षित असून, आतंकवादी हल्ले संपल्याचे त्यांनी सांगितले होते; परंतु गेल्या काही दिवसांत सैनिकांना लक्ष्य केले जात असून, त्यात मृत्युमुखी पडत असल्याच्या प्रश्‍नावर त्यांनी ‘यू टर्न’ घेतला. ‘मी संपलो’ असे म्हणालो नाही. कमी हल्ले होत असल्याचे म्हणालो, अशी सारवासारव केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांना नोटीस पाठवणाऱ्या चिल्लर आमदाराला जनताच जागा दाखवेल; बापूसाहेब पठारेंचा हल्लाबोल

Champions Trophy 2025: भारताचा ICC ने गेम केला ना भाऊ...! पाकिस्तानच असणार चॅम्पियन्स ट्रॉफीचा यजमान, BCCI काय करणार?

Latest Maharashtra News Updates : इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी

"मालिकेची अजूनही असलेली लोकप्रियता आणि थ्री इडियटचं ऑडिशन"; नव्वदीमधील लाडका 'गोट्या' आता काय करतो घ्या जाणून

सुरज आता तो सुरज राहिला नाही... बारामतीमध्ये अंकिता वालावलकरला आला वाईट अनुभव, म्हणाली- त्याचं वागणं पाहून...

SCROLL FOR NEXT