RTO Road Safety Rules esakal
नाशिक

Nashik News: अल्पवयीन पाल्यांना वाहन चालविण्यास देऊ नये; RTOकडून पालकांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वाहन चालविण्यासाठी परवाना वयाच्या १८ वर्षानंतर मिळतो. तरीही काही पालक आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देत असतात.

पण आता अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देणाऱ्या पालकांना तीन वर्ष कारावास अन् २५ हजारांचा दंड होणार असल्याची तरतूद कायद्यात केली असून पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी केले आहे. (Minors should not be allowed to drive Appeal to parents from RTO Nashik News)

अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यांवर वाहने चालविण्याचे प्रकार वाढत चालले आहे. त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. अठरा वर्षाखालील मुलांना वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे वाहन चालविण्याची परवानगी पालकांनी, वाहन चालकांनी देऊ नये, अशा प्रकारचे प्रबोधन प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एप्रिल २०२३ मध्ये विविध शाळा, खासगी क्लासेस तसेच महाविद्यालयात जाऊन केले होते.

त्यानंतर यावेळी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. यात एकूण ३५ वाहनांवर कारवाई करून न्यायालयात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यापैकी एका गुन्ह्यात निकाल लागलेला असून पालकास कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व रुपये २५ हजार रुपये इतका दंड झालेला आहे.

त्यामुळे पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये. त्याचप्रमाणे वाहन चालवताना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करावे आणि चारचाकी वाहन चालवताना सीटबेल्ट वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : थंडीत घट..! नाशिकचे किमान तापमान पोहोचले 17.7 अंशांवर

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT