Market Committee nashik esakal
नाशिक

Market Committee Election Result : पिंपळगावला राष्ट्रवादीचाच गजर; यतीन कदमांचा झाला प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पिंपळगाव बाजार समितीत आमदार दिलीप बनकर यांची २३ वर्षानंतरची सत्ता कायम राहीली आहे. ती उलथविण्यासाठी दिग्गज नेत्यांची मोट बांधून माजी आमदार अनिल कदम यशस्वी झाले नाही. (MLA Dilip Bankar won in Pimpalgaon market Committee election nashik news)

अपक्ष उमेदवार यतीन कदम यांनी प्रस्थापितांना दे धक्का देत बाजार समितीत प्रवेश केला. पिंपळगावचे सरपंच भास्करराव बनकर हे तीन मतांनी पराभूत झाले. आमदार बनकर यांच्या शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी ११ जागा जिंकून राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर केला.

सोसायटी व ग्रामपंचायत गटातील लढती तर अत्यंत कमी फरकाने एक-दोन अंकी झाल्या. आमदार दिलीप बनकर यांचा ५० मतांच्या फरकाने विजय झाला. गोदाकाठच्या मतदारांनी आमदार बनकर यांच्या पॅनलवर विश्‍वास दाखविला.

शेतकरी विकासने सोसायटी गटात चार, ग्रामपंचायत गटात दोन, महिला राखीव व भटक्या जमाती गटात प्रत्येकी एक, व्यापारी गटात दोन व हमाल मापारी गटात एक अशा अकरा जागा जिंकत पुन्हा सत्ता काबीज केली. ग्रामपंचायत गट माजी आमदार अनिल कदम यांचे वर्चस्व राहील ही शक्यता निकालात धूसर ठरली. अपक्ष उमेदवार यतीन कदम यांनी ग्रामपंचायत गटात सर्वसाधारण जागेवर २८८ मते मिळवून एकतर्फी विजयश्री खेचली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सोसायटीतील सर्वसाधारण गटात विजयाचा लबंक सातत्याने दोलायमान राहीला. परिवर्तन पॅनलचे डॉ. प्रल्हाद डेर्ले व प्रभाकर कुयटे यांच्या अवघ्या तीन मताचा फरक राहीला. एकाच गटाचे उमेदवार असल्याने फेरमतमोजणी टळली. महिला गटात शेतकरी विकासच्या मनीषा खालकर व परिवर्तनच्या अमृता पवार असा संमिश्र कौल मतदारांनी दिला.

ओबीसी गटात मविप्रचे माजी संचालक दिलीप मोरे यांनी शेतकरीविकासच्या विजय कारे यांच्यावर ८८ मतांनी एकतर्फी विजय मिळविला. सर्वसाधारण एका जागेवर यतीन कदम यांनी एकतर्फी विजय मिळवित असताना दुसऱ्या जागेवर परिवर्तन ज्येष्ठ नेते भास्करराव बनकर यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव करून शेतकरी विकासचे शिऱीष गडाख हे जायंटट किलर ठरले. याच गटात अनुसुचित जाती प्रवर्गात शेतकरीचे महेद्र गांगुर्डे यांनी किरण निरभवणे यांना २९ मतांनी धुळ चारली.

शेतकरी विकासचे विजयी उमेदवार (कंसात मिळालेली मते) सोसायटी गट ः आमदार दिलीप बनकर (५५३), ज्ञानेश्‍वर शिरसाट (४७४ मते), दीपक बोरस्ते (४४८), रामभाऊ माळोदे (४४१), महिला गट ः मनीषा खालकर (४५५), भटक्या जाती गट- जगन्नाथ कुटे (४८२), ग्रामपंचायत गट- सर्वसाधारण-शिरीष गडाख (२३१), अनुसूचित जाती-जमाती गट- महेन्द्र गांगुर्डे(३१५), व्यापारी गट- सोहनलाल भंडारी(४२९), शंकरलाल ठक्कर (३८२), हमाल-मापारी गट- नारायण पोटे(२११)

लोकमान्य परिवर्तन-सोसायटी गट-अनिल कदम (४७७), गोकुळ गिते (४७३), डॉ. प्रल्हाद डेर्ले (४२५), महिला गट- अमृता पवार(५१९), ओबीसी गट- दिलीप मोरे (४९०), ग्रामपंचायत गट- आर्थिक दुर्बल राजेश पाटील (३१९). अपक्ष उमेदवार-यतीन कदम-(२८८)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT