Nashik News : सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली ते साकुर सबस्टेशन ते ३३ केवी लाईनचे उद्घाटन शुक्रवारी दुपारनंतर पाच वाजेच्या सुमारास आमदार कोकाटे यांच्या हस्ते स्विच ऑन करून करण्यात आले.
सिन्नर तालुक्यातील भेडसावणारा विजेचा प्रश्न हा 80 ते 90 टक्के निकाली लागल्याचे आमदार कोकाटे यांनी कार्यक्रमा दरम्यान सांगितले. अनेक वर्षांपासून या भागातील शेतकरी यांची विजेच्या प्रश्नाबाबत तक्रार होती. (MLA Manikrao Kokate say Electricity problems in Sinnar taluka will be resolved soon Nashik News )
त्यातच एसएमबीटी व सिन्नर शहरातील पाणीपुरवठा या दोघांचीही एक्सप्रेस फिडर हे साकुर फाट्यावरून घेण्यात आलेले होते.
त्यामुळे दोन्ही तिन्ही मोटारी ह्या व्यवस्थित चालत नव्हत्या आठ आठ दिवस कडवा धरणावरून पंपिंग चांगल्या प्रकारे होत नसल्याने सिन्नर शहराला पाणीपुरवठा हा भेडसावत होता.
त्यामुळे अभियंता उपअभियंता यांच्याशी बैठक लावून व विचार विनिमय करून मूळ प्रश्नांशी हात घालून विजेचा प्रश्न हा मार्गी लावला कारण आज साकुर फाट्यावरून 3० ते 33 केव्ही लोड दिसत असल्याने आज तो 25 ते 26 दिसत आहे सिन्नर नगरपरिषद व एसएमबीटी महाविद्यालयात आणि चार ते पाच गावांचे शेतकरी यांच्या विजेचे प्रश्न हा निकाली लागलेला असून ही खूप मोठी बाब असल्याचे आमदार कोकाटे यांनी सांगितले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे, रतन जाधव, केरू दादा खतीले, अरुण घोरपडे , माजी जिल्हाध्यक्ष सुनील वाजे,नारायण भोसले ,महेश गाढवे, विठ्ठल राजे उगले, सरपंच पंढरीनाथ ढोकणे ,सरपंच प्रभाकर हारक, मुख्याधिकारी रितेश बैरागी,अभियंता श्री. ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंताश्री. राजाराम डोंगरे तसेच इंगतपुरी येथील उपकार्यकारी अभियंता श्री. प्रजापती व सिननर उपकार्यकारी अभियंता श्री. पवार, बाळासाहेब भोर, खेताडे सर, अनिल शेळके आदी उपस्थित होते. पुढे त्यांनी साकुर फाटा या सबस्टेशन विषयी माहिती सांगितली.
साकुर फाट्यावरून सुमारे 50 ते 55 किलोमीटर अंतरावरून अंडरग्राउंड तसेच मिलिटरी एरिया मधून पांढुर्ली ते सध्या साकुर सबस्टेशनसाठी ३३ केव्ही विद्युत पुरवठा सातपुर १३२ सबस्टेशन येथुन होत असल्याने साकुर ते सातपुर हे अंतर अंदाजे ५०-५५ किमी असल्याने ३३ केव्ही सप्लाय हा प्रत्यक्षात २५ ते २७ केव्ही इतकाच म्हणजेच कमी दाबाने साकुर सबस्टेशनला मिळत असल्याने ग्राहकांना उच्चदाबाने व अखंडीत विद्युत पुरवठा होत नव्हता.
तसेच ही सर्व लाईन शहरी भागातून भुमीगत मार्गाने व भारतीय लष्करी क्षेत्रातुन असल्याने तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी दोन-चार दिवस बिघाड शोधण्यासाठी महावितरणच्या कर्मचा-यांना लागत असायचा.
आमदार कोकाटे यांनी साकुर सबस्टेशनला होणा-या विद्युत पुरवठयाची तांत्रीक अडचण महावितरणच्या लक्षात आणुन देऊन त्या सुधाण्यासाठीच्या सुचना करत तात्काळ साकुर सबस्टेशनसाठी खापराळे १३२ येथुन ३३ केव्ही लाईनचे अंदाजपत्रक तयार करुन निविदा करण्याच्या सुचना दिल्या.
त्याप्रमाणे कार्यवाही सुरु झाली परंतु सदर ठेकेदाराने कालमर्यादेत काम पुर्ण न केल्याने ते काम पांढुर्ली पर्यंतच पुर्ण होऊ शकले त्यासाठी आमदार कोकाटे यांनी महावितरण अधिकारी यांच्या सोबत पुन्हा बैठक आयोजीत करुन पांढुली ते साकुर उर्वरित कामाचे नव्याने अंदाजपत्रक व निविदा करण्याच्या सुचना केल्या त्यानुसार सदर काम पुर्णत्वास गेले असुन शुक्रवार पासुन प्रत्यक्षात ग्राहकांना त्याचा लाभ मिळेल.
आमदार कोकाटे प्रयत्नातुन जिल्हा आकस्मित ( ACF) निधी अंतर्गत १ कोटी ५२ लक्ष निधीतून पांढुरली से साकुर सबस्टेशन ३३ केको लाईनमुळे सिन्नर शहराची नगरपालिका पाणी पुरवठा योजनेसह टाकेद गटातील १६ गावांतील शेतीपंप २९००.
व्यापारी ३४० व घरगुती २९५० असे एकुण ६१९० ग्राहकांना या ३३ केव्ही लाईनमुळे अखंडीत व उच्च दाबाने सुरळीत विद्युत पुरवठा होणार आहे.
यासाठी महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंताश्री. राजाराम डोंगरे तसेच इंगतपुरी येथील उपकार्यकारी अभियंता श्री. प्रजापती व सिननर उपकार्यकारी अभियंता श्री. पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
""आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नांतून साकुर वीज उपकेंद्राला पुरेशा क्षमतेने व अखंडित वीजपुरवठा होणार आहे.त्यामुळे या वीजउपकेंद्राला जोडलेल्या गावांतील व शिवारातील वीजपुरवठयातील अडचणी दूर झाल्या आहेत.
पाणी असून केवळ खंडित वीजपुरवठयामुळे शेतीचे सिंचन अडचणीत येत असे.त्यातून शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडायचे.आता पुरेशा क्षमतेने वीज मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यासाठी आमदार कोकाटे यांचे आभार व्यक्त करतो.""
महेश गाढवे शेतकरी.
""सिन्नर शहरासाठी २४ तास नळ पाणीपुरवठा योजना आमदार माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून कडवा धरणातून राबविली गेली आहे.मात्र वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठयामुळे ही योजना सुरळीत चालविणे शक्य नव्हते.
आता साकुर वीज केंद्रात पुरेसा वीजपुरवठा आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नांतून मिळत असल्याने कडवा धरणावरील सिन्नर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे मोटरपंप सुरळीत सुरू राहतील.त्यातून सिन्नर शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकतो.""
माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.