MLA Rahul Dhikale statement regarding devendra Fadnavis esakal
नाशिक

MLA Rahul Dhikale | फडणवीस सरकारच्या काळात जल्लोषात सण साजरे : आमदार ढिकले यांचा विधानसभेत जयघोष

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, रामरथ यात्रा, वीरांची मिरवणुक, रंगपंचमी यासारख्या सणांवर बंदी आणून जे साजरे करतील त्यांच्यावर बंदी आणण्याचे उद्योग झाले. पोलिसांनी अडथळे आणले.

परंतु केंद्रासह राज्यात हिंदूंचे सरकार स्थापन झाल्यानंतर असुरक्षिततेची भावना दूर होऊन दुप्पट जल्लोष झाल्याचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी विधानसभेत सांगितले. (MLA Rahul Dhikale statement regarding devendra Fadnavis government festivals celebration in assembly nashik news)

विधिमंडळाचे अधिवेशन मागील आठवड्यात संपले. त्यापूर्वी अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते. ते म्हणाले, नाशिकमध्ये रामनवमीच्या निमित्ताने काळाराम मंदिरातून रामरथ यात्रा काढली जाते. यात्रेच्या निमित्ताने पारंपरिक वाद्ये वाजविली जातात.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाद्ये वाजविण्यास बंदी घालण्यात आली. धूलिवंदनाच्या दिवशी पारंपरिक वीरांची यात्रा भरविले जाते. या शस्त्रे उंचावून नाचण्याची परंपरा आहे. परंतु शस्त्र नाचविण्यास विरोध करण्यात आला. पोलिसांनी बंदोबस्त लावून अडथळे निर्माण केले. रंगपंचमीनिमित्त राहाडीवर रंग खेळला जातो.

या परंपरेचे पालन करण्यासाठी पोलिसांकडून परवानगी दिली जात नव्हती. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात हिंदूंचे सण साजरे करताना धडकी भरत होती. परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हिंदूमध्ये असुरक्षिततेची भावना नष्ट होऊन दुप्पट जल्लोषात सण साजरे होत आहेत.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

भाजप कार्यालयावर हल्ला करणारे मोकाट

भाजप कार्यालयावर हल्ला करणारे फरार झाले होते. परंतु संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत दिसून आले. सातपूर विभागात भाजप मंडल अध्यक्षाची हत्या करण्यात आली. संशयितांच्या अटकेसाठी भाजप पदाधिकाऱ्यांना आंदोलनाला बसावे लागले. यावरून गुन्हेगारांना पाठीशी घातले जात असल्याचे स्पष्ट होते.

"राज्य सरकार पारदर्शी व न्यायदानाचे काम करीत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सण, उत्सव जल्लोषात साजरे केले जात आहेत." - ॲड. राहुल ढिकले, आमदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT