देवगाव (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्यातून व निफाड तालुक्यातील देवगाव येथील पहिल्यांदाच सीमा सुरक्षा दलात (SSB) रुजू झालेल्या महिला जवान गायत्री विठ्ठल जाधव हिचे निधन झाल्याची घटना घडली आहे. तिच्या घरी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सांत्वनपर भेट दिली. (MLA Rohit Pawar accepted educational responsibility of Gayatris sister at devgaon nashik Latest Marathi News)
अत्यंत गरिबी परिस्थितीतून शिक्षण घेत तिची २०२१ मध्ये स्टाफ सिलेक्शनच्या सीमा सुरक्षा बलाच्या परीक्षेत ती पास झाली. त्यानंतर राजस्थान येथील अलवर येथे ट्रेनिंगसाठी तिची निवडही झाली. राजस्थानमध्ये ट्रेनिंग पूर्णत्वास जात असताना खड्ड्यात पडून तिचा अपघात झाला. त्यावेळी तिच्या मेंदूवर जयपूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. तिला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने अधिक उपचारासाठी एम्स दिल्ली येथे संदर्भ देण्यात आला. मात्र तिथे जाण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. याबाबत माहिती कळताच आमदार रोहित पवार यांनी गायत्रीच्या घरी सांत्वनपर भेट दिली.
या वेळी आ. पवार यांनी सैन्यदलातील अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेत त्यांना गायत्रीच्या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी विनंती केली. या वेळी गायत्रीचे मामा गणेश कोकणे व आई-वडिलांनी आमदार पवारांना गायत्रीच्या आजारपणादरम्यान आलेल्या सर्व अडीअडचणींची माहिती दिली. गायत्रीची बहीण पूजा जाधव हिच्या आगामी काळातील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेऊन कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन या वेळी आमदार रोहित पवारांनी दिले.
हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...
पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या सीईटीच्या क्लासची नाशिक येथे सोय करून दिली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य हरिश्चंद्र भवर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, मनोहर बोचरे, धनंजय जोशी, उपसरपंच लहाणू मेमाणे, विंचूर सरपंच सचिन दरेकर, रुईचे उपसरपंच केदारनाथ तासकर, विकास संस्था चेअरमन सतीश लोहारकर, संतोष बोचरे, संपत अढागळे आदी उपस्थित होते.
मान्यवरांकडून सांत्वनपर भेट
गायत्री जाधव यांच्या घरी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, माजी जि. प. सदस्य अमृता पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ, डॉ. श्रीकांत आवारे, डॉ. विकास चांदर, शिवाजी सुपनर यांनी सांत्वनपर भेट घेत चौकशी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.