Satyajeet Tambe : छत्रपती शिवरायांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगेत गडकोट बांधले. त्यांनी महाल बांधले नाहीत. रयतेच्या राज्यासाठी सर्वस्व त्यागलेल्या शिवरायांच्या गडकिल्ल्यांची हालत बघता त्यांची सर्वोतोपरी उपेक्षाच आहे.
त्याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्षच आहे, हे वास्तव आहे. दुर्गसंवर्धन कार्यात अखंडित राबणाऱ्या राम खुर्दळ यांना आपण साथ दिली पाहिजे. मातीच्या कविता लिहिणारे साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर यांच्या लेखणीची ताकत मोठी आहे.
या दोघांना ‘परिवार भूषण’ पुरस्कार देताना मनस्वी आनंद झाला, असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले. (MLA Satyajeet Tambe statement Ignoring Chhatrapati Shivaji maharaj forts nashik)
महाराष्ट्र माझा परिवारातर्फे नांदूर मानूर येथील आनंद बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे अध्यक्षस्थानी होते.
व्यासपीठावर दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, विठ्ठलराजे उगले, नारायण वाजे, प्रशांत दिवे, प्रा. राजाराम मुंगसे, बंटी भागवत, धोंडीराम रायते, मुकुंद पिंगळे, धनाजी राजोळे, दीपक कदम, बाजीराव कमानकर, प्रा. जावेद शेख, शिवाजी हांडोरे, रूपचंद ढिकले, संजय जाधव, मनोज ठाकरे, सचिन उगले उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शिवशाहीर स्वप्नील डुंबरे यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दुर्गसंवर्धक राम खुर्दळ व साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर यांना राज्यस्तरीय ‘परिवार भूषण’ पुरस्कार देण्यात आला. शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह व ११ हजार रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
राम खुर्दळ व साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सचिन उगले यांनी सन्मान पत्राचे वाचन केले. बाजीराव कमानकर यांनी प्रास्ताविक केले. पत्रकार मुकुंद पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. जावेद शेख यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.