नाशिक : सिडकोतील घरांचे बांधकाम करताना तसेच खरेदी विक्रीसाठी ना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे. मात्र, अशा प्रकारचा दाखला देताना रहिवाशांची अडवणूक केली जात असल्याची तक्रार आमदार सीमा हिरे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. (MLA Seema Hire complaint to Guardian Minister for recovery of No Objection Certificate from cidco people Nashik News)
सिडकोतील 28 हजार घरे फ्री होल्ड करण्याची मागणी नागरिकांची आहे. त्या अनुषंगाने महापालिकेत झालेल्या बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे आमदार सीमा हिरे यांनी मागणी केली असता, शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर सिडकोतील घरांचे बांधकाम करताना किंवा घरांची खरेदी किंवा विक्री करायची झाल्यास सिडकोकडून रहिवाशांची अडवणूक केली जाते. ना हरकत दाखल्यासाठी 50 ते 60 हजार रुपयांची मागणी केली जाते. सिडकोतील घरांमध्ये राहणारा वर्ग कामगार असल्याने एवढी मोठी रक्कम व तीदेखील अडवणुकीचे भीतीपोटी देणे परवडत नाही.
चुकीच्या पद्धतीने पैसे वसूल केले जात असल्याने घरांच्या किमतीदेखील वाढल्या आहे. गोरगरिबांना ही रक्कम परवडत नसल्याने अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार सीमा हिरे यांनी केली. महापालिका अधिकाऱ्यांची बैठक असली तरी सिडकोच्या अधिकाऱ्यांना बैठकीत बोलविण्याची मागणी या वेळी करण्यात आली. पालकमंत्र्यांनीदेखील सिडकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कांचन बोधले यांना तातडीने बोलावून माहिती घेतली.
फाळके पुरस्कारासाठी पाठपुरावा
चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांची नाशिक ही जन्म व कर्मभूमी आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिला जाणारा महत्त्वाचा फाळके पुरस्कार सोहळा नाशिकला आयोजित करावा, अशी सूचना आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी मांडले.
यासंदर्भात आपण शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन पालकमंत्री भुसे यांनी दिले. शहरातील झोपडपट्ट्यांसाठी एसआरए स्कीम राबविण्याची मागणी आमदार फरांदे यांनी केली. त्याचबरोबर घोषित व अघोषित अशा दोन्ही प्रकारच्या झोपडपट्ट्यांसाठी स्कीम राबविण्याची मागणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.