MLA Suhas Kande esakal
नाशिक

MLA Suhas Kande | करंजवन पाणीपुरवठा योजनेचे 13 फेब्रुवारीला भूमिपूजन : सुहास कांदे

सकाळ वृत्तसेवा

मनमाड (जि. नाशिक) : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मनमाडचा पाणीप्रश्न अखेर मिटणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ३११ कोटींच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि एमआयडीसीची घोषणा होणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली.

आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (MLA Suhas Kande statement Bhoomipujan of Karanjavan water supply scheme on February 13 nashik news)

यावेळी उपजिल्हा प्रमुख सुनील हंडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, महिला शहरप्रमुख विद्या जगताप, संगीता बागूल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

आमदार कांदे म्हणाले, की चाळीस वर्षांपासून शहराचा पाणीप्रश्न रखडलेला होता. अनेकांनी प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. नांदगांव तालुक्याचा आमदार म्हणून माझी जबाबदारी असल्याने मी मनमाड शहराचा पाणीप्रश्न मिटावा यासाठी प्रयत्न केले.

त्याला यश आले आहे. मनमाडसाठी जीवनदायिनी असलेली करंजवन पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जात आहे. येथील महर्षी वाल्मीकी क्रीडा संकुलावर त्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ऐतिहासिक योजनेचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला पालकमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तानाजी सावंत, उद्योग मंत्री उदय सामंत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी, खा. डॉ श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

ठळक मुद्दे

-नांदगावच्या शिवसृष्टीचे ऑनलाइन भूमिपूजन

- नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी अद्ययावत २ फिरते दवाखाने

-शासकीय दाखले उपलब्ध करून देणारे २ फिरते शासकीय कार्यालये

- नागरिकांसाठी मोफत २ जेसीबी

- दिव्यांग बांधवांसाठी उपयोगी साधने

-५ कोटींचे जलतरण तलाव

- ट्रामा केअर सेंटर उभारणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT