MNS office bearers and activists while protesting on College Road. esakal
नाशिक

Nashik MNS News: इंग्रजी पाट्यांवरून मनसे आक्रमक! कॉलेज रोडला पाट्यांना फासले काळे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर ज्या पाट्यांवर मराठी नामाक्षरे नाहीत. त्या पाट्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली.

कॉलेज रोड व गंगापूर रोड भागात इंग्रजी पाट्यांना काळे फासण्यात आले. तर ठक्कर बाजार येथील एका कुरिअर कंपनीच्या इंग्रजी पाटी फोडण्यात आली. आंदोलकांनी मनसेचा जयघोष करण्यात आला. (MNS aggressive on English boards Boards on College Road black Nashik News)

२५ नोव्हेंबरपर्यंत इंग्रजीबरोबरच मराठी पाट्या लावण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने दिली होती. ती मुदत संपुष्टात आल्यानंतर आणखी दोन दिवसांची मुदतवाढ महापालिकेकडून देण्यात आली.

बुधवारी (ता. २९) मराठी पाट्या लावण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. ३०) कॉलेज रोड येथील डॉन बॉस्को शाळेसमोर आंदोलन केले. या भागात मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत.

ज्या दुकानांवर मराठी पाट्या नाहीत तेथे त्यांनी पाट्यांना काळे फासण्याचे आंदोलन केले. प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, मनसे कामगार सेना प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, मनोज घोडके, नामदेव पाटील,

अमित गांगुर्डे, संजय देवरे, मिलिंद कांबळे, उपशहराध्यक्ष सचिन सिन्हा, संतोष कोरडे, विजय आहेरे, अक्षय खांडरे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, साहेबराव खर्जुल, धीरज भोसले, बंटी लभडे, नितीन माळी, प्रमोद साखरे, अर्जुन वेताळ, निकितेश धाकराव, नीलेश शहाणे, देवचंद केदारे, विजय ठाकरे,

निखिल सरपोतदार, राकेश परदेशी, किरण क्षीरसागर, ज्ञानेश्वर बगडे, महिला सेना जिल्हाध्यक्ष ज्योती शिंदे, शहराध्यक्ष आरती खिराडकर, अरुणा पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कौशल पाटील, शहराध्यक्षा ललित वाघ, विद्यार्थी सेना उपशहराध्यक्ष रोहन जगताप आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT