mns sell petrol esakal
नाशिक

मनसेची गांधीगिरी! 53 रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल विक्री

विक्रांत मते

नाशिक : काही दिवसात पेट्रोलच्या दरामध्ये (petrol price) भरमसाट वाढ झाली आहे. १०२ रुपये लिटर पेट्रोल असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या संतापाला वाट मोकळी करून देण्याच्या उद्देशाने पक्षप्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून मनसेकडून गांधीगिरी करण्यात आली आहे. (MNS-Sell-​​petrol-at-cheap-rate-nashik-marathi-news)

कोरोना काळात काही अंशी दिलासा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून मनसेतर्फे सोमवारी (ता.१४) त्र्यंबक नाका येथील एका पंपावर ५३ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल वितरित करून गांधीगिरी पद्धतीने दरवाढीविरोधात आंदोलन केले. पन्नास रुपये कमी दराने पेट्रोल मिळाल्याने शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला. कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. त्यात इंधन दरवाढ सातत्याने होत असल्याने महागाईचा भडका उडाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना काही अंशाने का होईना दिलासा देण्याच्या उद्देशाने पेट्रोल वितरित केल्याचे जिल्हाध्यक्ष दातीर व शहराध्यक्ष पवार यांनी माहिती दिली.

यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, मनविसेचे जिल्हाध्यक्ष श्‍याम गोहाड, शहराध्यक्ष संदेश जगताप, शारीरिक सेनेचे शहराध्यक्ष विजय आगळे, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे शहराध्यक्ष सिद्धेश सानप, सरचिटणीस पंकज बच्छाव, पंकज दातीर, बबलू ठाकूर आदी या वेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT