CM Eknath shinde & MNS Chief Raj thackeray latest news esakal
नाशिक

Political News : टोल नाक्यावरून मनसे- शिंदे सेना येणार आमनेसामने

विक्रांत मते

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलत्या राजकीय परिस्थितीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या शिडात हवा भरताना भावनेचा आदर करत आंदोलने हाती घेताना यापूर्वी केलेल्या आंदोलनाचे फलित नागरिकांपर्यंत पोचविण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना मनसेकडून येत्या काळात टोल नाक्यावरील अरेरावीवरून आंदोलने हाती घेण्याचे नियोजन सुरू आहे.

या नियोजनात मुख्यमंत्री शिंदे समर्थकांकडून चालविल्या जाणाऱ्या टोलनाक्यांचा समावेश असल्याने येत्या काळात मनसे विरुद्ध शिंदे सेना असा उघड सामना होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. (MNS Shinde Sena will come face to face on Toll plaza point Maharashtra Political News)

दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्याच्या राजकारणाच्या मैदानात ताकदीनिशी उतरले आहे. मुंबईत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी त्यांच्या शिडात हवा भरण्याचे काम केले.

लोकांपर्यंत ताठ मानेने जा, मनसेने आतापर्यंत केलेली आंदोलने व त्याचे फलित याची माहिती नागरिकांपर्यंत पोचवा. त्याचबरोबर लोक भावनेशी निगडित असलेली आंदोलने हाती घेण्याच्या सूचना त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.

ठाकरे यांच्या या सूचनेला आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी आहे. त्या अनुषंगाने मनसेच्या वतीने येत्या काळात टोल नाक्याविरुद्ध आंदोलन करण्याची व्यूहरचना आखली जात आहे.

सेनेचे दोन पदाधिकारी लक्ष

शिवसेनेची संबंधित असलेले मोठे पदाधिकारी आता शिंदे सेनेत सहभागी झाले आहे. घोटी व शिंदे गाव येथील टोल नाका या दोन्हींची संबंधित आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही पदाधिकारी यापूर्वी मनसे सोबत होते.

गुंडगिरीमुळे यातील एका पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. तर एका पदाधिकाऱ्यावर यापूर्वीच गद्दारीचा शिक्का मारण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली असलेल्या टोल नाक्यांवर आंदोलने करण्याची तयारी करण्यात आली आहे. मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे.

नाशिक ते मुंबईचा प्रवास तीन तासांचा असताना साडेचार ते पाच तास लागतात. हा मुद्दा घेऊन घोटी टोल नाक्यावर आंदोलन करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. तर शिंदे टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांची अरेरावी वाहनधारकांना त्रासदायक ठरत असल्याने या मुद्द्यावर आंदोलन होणार असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यात बंडखोरांकडून आव्हान उभे; पाचही मतदारसंघांत मतविभाजनाचे डावपेच

Meesho: आता टी-शर्टवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो... मीशोवर नेटकऱ्यांचा संताप! कंपनीनं काय दिलं स्पष्टीकरण?

Kartiki Yatra : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू राहणार

अखेर भुलभुलैय्या 3 ने सिंघम अगेनला टाकलं मागे; बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये कार्तिकच ठरला अजयपेक्षा सरस

Nashik Vidhan Sabha Election : बंडखोरांच्या तलवारी म्यान; बहुतांश बहुरंगी लढती

SCROLL FOR NEXT