MNS News : महापालिकेत सर्वात मोठी युनियन असलेल्या शिवसेनाप्रणित म्युनिसिपल कर्मचारी- कामगार सेनेचे ठाकरे व शिंदे गट असे दोन गटात विभागणी झाल्याने दोन्ही गटांना शह देवून महापालिका मुख्यालयात झेंडा फडकविण्यासाठी मनसेने तयारी सुरू केली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना अध्यक्षपदी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सलीम शेख यांची नियुक्ती झाली. (MNS strategy to support Shinde group Salim Shaikh as army president of Kamgar Sena MNS News)
महापालिकेत सर्वात मोठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे सदस्य अधिक आहे. महापालिकेत मनसेची सत्ता असताना व त्यानंतर भाजपच्या सत्ताकाळात शिवसेनेच्या युनियनला शह देवून सभासद संख्या वाढविण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षाकडून झाले.
परंतु दोन्ही पक्षांच्या सत्ताकाळात शह देणे जमले नाही. परंतु सध्या शिवसेनेत ठाकरे व शिंदे असे दोन गट निर्माण झाल्याने त्याचा फायदा घेत मुसंडी मारण्यासाठी मनसेने माजी स्थायी समिती सभापती सलीम शेख यांच्या खांद्यावर मनसे कामगार सेनेची धुरा दिली आहे. मनसे शहर कार्यालयात त्यांच्याकडे संघटनेची सूत्रे देण्यात आली.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
यावेळी मनसेनेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार ईचम, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, दिलीप दातीर, कामगार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील, मनोज घोडके, अनंत सांगळे,
माजी नगरसेवक योगेश शेवरे, शहर उपाध्यक्ष संतोष कोरडे, सचिन सिन्हा, अक्षय खांडरे, रस्ते आस्थापना सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित गांगुर्डे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, योगेश लभडे, नितीन माळी, साहेबराव खर्जुल आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.