MNS support to BJP  
नाशिक

काय चाललंय पक्षात? : BJPच्या भरवशावर MNSचा ‘राजतिलक’

विक्रांत मते

‘राजतिलक की करो तय्यारी, आ रहे हैं भगवा धारी’ असे म्हणत हिंदुत्वाची भगवी शाल पांघरलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) भूमिका भारतीय जनता पक्षाच्या (BJP) भरवशावरच असल्याचे दिसून येत आहे.

स्वकर्तृत्व तर काहीच नाही, परंतु बदलत्या राजकीय परिस्थितीत राजकीय पक्षांच्या भांडणातून काहीतरी लाभ पदरात पडेल. एवढ्याच आशेवर पक्ष व कार्यकर्ते टिकून असल्याचे दिसते. (mns support to BJP maharashtra political news psl98)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर नाशिकमधून पक्षाला भरभरून मिळाल्याने राज्यात मनसेचा नाशिक पॅटर्न तयार झाला. स्थापनेनंतर महापालिकेत १२ नगरसेवक त्यानंतर २००९ मध्ये शहरातून तीन आमदार व २०१२ मध्ये ४० नगरसेवक निवडून आल्याने महापालिकेत सत्ता मिळाली.

सत्तेनंतर श्रीमंती आल्यानंतर घरात भांडणे सुरू होतात. तसे या पक्षाच्या बाबतीत नाशिकमध्ये झाले. राज ठाकरे यांनी स्वतःच्या ओळखीने कॉर्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून दहा ते बारा प्रकल्प आणल्याने कौतुकाचा विषय ठरला.

टाटा, रिलायन्ससारख्या कंपनीचे पाय नाशिकला लावले; परंतु नेत्याने जे केले ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांना टिकविता आले नाही. याच काळात भाजपची चांगलीच हवा तयार झाली. त्याची परिणती महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची पूर्ण बहुमताने सत्ता आली.

दुसरा क्रमांक मनसेचा असणे अपेक्षित असताना तिथे शिवसेनेने मुसंडी मारली. मनसेच्या ४० नगरसेवकांची संख्या पाचवर आली. जे निवडून आले तेथे पक्षापेक्षा निवडून येणाऱ्यांचाच प्रभाव अधिक असल्याने मनसेचा झेंडा फडकत आहे.

त्यानंतरच्या पाच वर्षांत महापालिका पातळीवर नगरसेवकांना कर्तृत्व गाजविता आले नाही. कधी भाजप, तर कधी शिवसेनेच्या दावणीला बांधण्याचे काम झाले. जशी महापालिकेच्या पातळीवर स्थिती, संघटना पातळीवर त्यापेक्षा वाईट स्थिती आहे.

राज ठाकरे यांचे पाच वर्षे जसे दुर्लक्ष झाले तसेच पक्षाने संधी असूनही मोठे काम व सत्तेविरोधात आंदोलन उभारले नाही. काही आंदोलने झाली; परंतु ती अल्पकाळातच गुंडाळली. दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना मुस्कटदाबीला सामोरे जावे लागले. संघटना बलशाली होणे सोडाच, आहे ते कार्यकर्ते व पदाधिकारी अन्यत्र वळताना दिसले. त्यातून संघटनेचे बळ कमी होत गेले.

अशा परिस्थितीत पुढील निवडणुकीत काही खरे नाही. नगरसेवकांची आहे ती संख्या टिकविता येईल का, असा प्रश्न पक्षातच निर्माण झाला असताना बदलत्या राजकीय परिस्थितीने सध्या जान आणली आहे.

हिंदुत्व भोंगे आणि पाठिंबा

महाविकास आघाडीविरोधात भाजप या राजकीय हाणामारीत असे काही पत्ते पडले, ते मनसेला फायदेशीर ठरताना दिसत आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले नाही. शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका करण्याची संधी भाजपला मिळाली.

एका बाजूने भाजपकडून शिवसेनेवर हल्ला होत असताना दोघांत तिसरा म्हणून हिंदुत्वाची जागा मनसेकडून घेण्याचा प्रयत्न झाला. जाहीर सभांमधून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार करताना भगवी शाल पांघरून राम-लल्लाच्या दर्शनाची घोषणा केली.

त्यानंतर मशिदींवरील भोंग्यांचे राजकारण असे नानाविध प्रयत्न करून भाजप व मनसेशी जवळीक वाढली व महापालिका निवडणुकांमध्ये युतीची चर्चा होऊ लागली. सध्याच्या सत्तेच्या राजकारणात ४० आमदारांचा गट मनसेत विलीनीकरण करण्याच्या चर्चा सुरू असल्याने मनसेला बूस्टर डोस मिळत आहे. बुडत्याला काडीचा आधार मिळणार या आशेवर पक्षात अनेक जण आहेत.

"येत्या पंधरा दिवसांत नाशिकमध्ये येऊन निवडणुकीसंदर्भात रणनीती आखली जाणार आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी आम्ही करत आहोत. " - बाळा नांदगावकर, मनसे संपर्कप्रमुख, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय देरकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT