mobile towers esakal
नाशिक

आदिवासी भागातही आता मोबाईल टॉवर्स! नेटवर्कअभावी विद्यार्थ्यानी केली होती आत्महत्या

रविंद्र पगार

कळवण (जि.नाशिक) : कोविडकाळात (corona virus) राज्यातील सर्वच शाळा दीड वर्षापासून बंद आहेत. शहरी भागात विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासासाठी (online study) नेटवर्क उपलब्ध होते. परंतु आदिवासी भागातील (tribal areas) केवळ आठ टक्के आदिवासी विद्यार्थांकडे ऑनलाइन शिक्षणाची सुविधा आहे. नेटवर्कअभावी नवोदय विद्यालयातील विपुल पवार या विद्यार्थ्याने अभ्यास बुडत असल्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली होती.(Mobile network now in tribal areas)

आदिवासी भागात आता मोबाईल नेटवर्कचे जाळे

सुरगाणा तालुका हा आदिवासी अतिदुर्गम प्रदेश असून, तालुक्यात अनेक भागात डोंगर, दऱ्या-खोऱ्यांत राहणाऱ्या आदिवासी जनतेपर्यंत अद्यापही नेटवर्क पोचले नाही. आदिवासी भागामध्ये टॉवरची उभारणी झाली होती; परंतु बहुतांश टॉवर कार्यान्वित नव्हते. आमदार नितीन पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यांतील मोबाईल नेटवर्क सेवा सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साखडे घातले होते. त्याचे फलित म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिओ कंपनीच्या अधिकाऱ्यांना मोबाईल टॉवरसह नेटवर्क पुरविण्याच्या सूचना केल्या आहेत.

सुरगाणा, कळवण भागात जिओचे टॉवर; आमदार पवार यांच्या पाठपुराव्याला यश

२०१७ पासून सुरगाणा तालुक्यातील मोबाईल टॉवर केवळ शोभेच्या वस्तू बनल्या होत्या. नेटवर्कसाठी ग्रामस्थ डोंगर, जंगल आणि झाडांवर जाऊन, तसेच शेजारील गुजरात राज्याच्या नेटवर्कचा आधार घेत होते. कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठीसुद्धा नेटवर्कची गरज असल्याने आमदार नितीन पवार यांनी जिओ कंपनीचे जिल्हा समन्वयक विकास ताजणे व ललित महाजन यांच्याशी संपर्क साधून सुरगाणा तालुक्यात भूमिगत दूरसंदेश वाहकतारांद्वारे प्रत्येक टॉवर नेटवर्कच्या जाळ्याने जोडण्यासाठी पाठपुरवा केला होता. त्यामुळे सुरगाणा तालुक्यातील राक्षस भुवन, भवाडा, भेंडवळ, फणसपाडा, आमदा पळसन, बाफळून, तोरण डोंगरी, अलंगुण, उंबरठाण, करंजूल, हाडकाईचोंड, आंबाठा, कोठुळा, भोरमाळ, खोबळा, धुरापाडा, काशी शेम्बा, शिंगलचोंड, सराड, हतगड, बोरगाव ते गुजरात हद्दीपर्यंतची गावे भूमिगत दूरसंदेश वाहक तारांद्वारे जोडण्याचे काम मंगळवार (ता. १८) पासून सुरू झाले. मोखपाडा, सांभरखल, ठाणगाव, आंबोडे, आळीवपाडा, रानपाडा, खिराड, खिर्डी, खोकरविहीर, देशमुखनगर, गोंददगड, गोपालनगर, वाघधोंड, भेगू, सावरपाडा, वांगण, बर्डा, सालभोये, दांडीचीबारी, हरणटेकाडे, जामुनमाथा या गावातील टॉवरही नेटवर्कने जोडली जाणार आहेत. कळवण तालुक्यातील जयदर, दळवट, चिंचपाडा, गणोरे, शिरसमणी, शिरसा, देवळीकराड, बोरदैवत, सरलेदीगर, मुळाणे, करंभेळ, गोपाळखडी, आठंबे, दरेभणगी, बिजोरे, मानूर, हिंगळवाडी, गोबापूर, पिळकोस येथे टॉवरदेखील सक्षम नेटवर्कने जोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मोबाईल नेटवर्कसाठी पाऊल

आदिवासीचे जीवनमान उंचविण्यासाठी व आदिवासी बहुल भागातील विद्यार्थांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अतिदुर्गम डोंगराळ भागात मोबाईल नेटवर्कची गरज आहे. तालुक्यात इंटरनेटच्या सुविधेसह मोबाईल नेटवर्कचे जाळे विणले जाणार आहे. आदिवासी तालुक्यातील सुरगाणा येथील एकूण ३३ टॉवर, कळवण येथील ३२ मोबाईल टॉवर नेटवर्कने जोडण्यासाठी पाऊल उचलल्याने स्थानिक ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT