Two suspects were arrested in the police operation and the bike and mobile phone were seized. esakal
नाशिक

Nashik Crime News : मनमाडला मोबाईल चोरटे गजाआड

सकाळ वृत्तसेवा

मनमाड (जि. नाशिक) : शहरातील आठवडे बाजारातून मोबाईल चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना शहर पोलिसांच्या पथकाने शिताफिने अटक करून त्यांच्याकडून दोन महागडे मोबाईल जप्त केले. (mobile phone theft robbers jailed Nashik Crime News)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

रविवारी मनमाड शहरात भरलेल्या आठवडे बाजारात खरेदीसाठी आलेल्या दोन नागरिकांचे मोबाईल चोरीस गेले होते. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनमाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. प्रभारी पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी तत्काळ आठवडे बाजारात पेट्रोलिंगसाठी अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक केली होती.

पोलिस पथक आठवडे बाजारात पेट्रोलिंग करत असताना साई प्रसन्न लॉन्स समोर त्यांना दोन जण संशयास्पद हालचाल करताना आढळले. त्यानंतर पोलिसांनी यावेळी सुनील पवार (वय २२), लकी परबसिंग सोलंकी (वय २०) दोघेही रा. भोपाळ, मध्यप्रदेश यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी व झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन महागडे मोबाईल मिळून आले.

यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून एक दुचाकीही जप्त केली. संशयितांकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Press Conference: सरकारच्या प्रत्येक कृतीवर संशय, धोक्यात असलेल्या महाराष्ट्र वाचवायचा आहे, पत्रकार परिषदेतून मविआची टीका

Women's T20 World Cup: भारताला सेमीफायनलला पोहोचण्यासाठी पार करावा लागणार ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या कसं आहे समीकरण

Salman Khan : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ ; घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Nanded Assembly Elections 2024: नांदेड दक्षिणमध्ये वाढणार चुरस; महाविकास, महायुतीमधील दावेदारांची संख्या वाढली

Parbhani Assembly Elections 2024: परभणी विधानसभेची जागा भाजपला; उमेदवारी देण्याचा निर्णय गुलदस्त्यात..

SCROLL FOR NEXT