Chief Security Officer of BPCL Company Shri. G. Rajasekhar esakal
नाशिक

Nashik News: शाळेत आग अन्‌ सुटकेचा निःश्वास! येवल्यात विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी मॉकड्रिल

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शाळा सुरू असताना, अचानक लागलेली आग न्‌न विद्यार्थ्यांची झालेली धावपळ... अवघ्या एक मिनिट ३४ सेकंदात संपूर्ण इमारत मोकळी होते अन्‌ सुखरूप असल्याने सर्वजण सुटकेचा नि:श्‍वास घेतात, हे दृश्य होते विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये आगीच्या प्रसंगी घेतल्या जाणाऱ्या मॉकड्रिलचे! (Mock drill for students at Yevlyat Vidya International School Nashik News)

धानोरे येथील विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुरुवारी (ता. २७) फायर सेफ्टी म्हणजेच आगीपासून आपला व इतरांचा बचाव कसा करावा? काय काळजी घ्यावी, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर व्याख्यान व प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

एखाद्या इमारतीला किंवा कुठेही सार्वजनिक ठिकाणी आग लागल्यास कोणत्या गोष्टी कराव्या व कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनमाड येथील बीपीसीएल कंपनीमधील मुख्य सुरक्षा अधिकारी श्री. जी. राजशेखर उपस्थित होते.

त्यांनी विद्यार्थ्यांना आग कशी लागते? आग लागण्याची कारणे कोणती व आग किती प्रकारची असते, याबद्दल मार्गदर्शन केले, तसेच आग लागल्यानंतर काय करावे, आपण राहतो त्या घराची, इमारतीची सुरक्षितता कशी राखावी, याची माहिती दिली.

श्री. राजशेखर यांनी विद्यार्थ्यांना पॉवर पॉइंटद्वारे सुरक्षेसाठी वापरली जाणारी वेगवेगळी उपकरणे व त्यांचा उपयोग कसा केला जातो, याबद्दल माहिती दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आग, फायर एक्सटिंगविशर म्हणजेच अग्निरोधकाच्या सहाय्याने कशी विझवावी याचे प्रात्यक्षिक श्री. जी. राजशेखर, सहकारी सुनील आहेर, अमित शिंदे यांनी करून दाखविले.

शाळेतील कर्मचाऱ्यांनाही अग्निरोधक कसा वापरावा, याची माहिती दिली. तत्पूर्वी अचानक शाळेचा इमारतीला आग लागली, तर मुलांनी काय करावे, अशी वास्तविक परिस्थिती तयार करून मॉकड्रिल घेण्यात आले.

मॉकड्रीलमध्ये संपूर्ण शाळेची इमारत १ मिनिट ३४ सेकंदात रिकामी झाली. मॉकड्रिल करीत असताना श्री. राजशेखर यांनी निरीक्षण करून शाळेच्या या अनोख्या उपक्रमातबाबत इतकी जागरूक आहे व विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रात्यक्षिक पाहिले व समाधान व्यक्त केले.

संस्थाध्यक्ष डॉ. राजेश पटेल, संचालिका डॉ. संगीता पटेल यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. मुख्याध्यापिका शुभांगी शिंदे यांनी आभार मानले. क्रीडाशिक्षक किरण कुलकर्णी व मोईज दिलावर यांनी नियोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT