Medical team during a presentation on first aid to the injured in rope way garden in case of emergency. esakal
नाशिक

Nashik News: नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून मॉकड्रील! सप्तशृंगी गड भाविकांनी अनुभवली चित्तथरारक प्रात्यक्षिके

सकाळ वृत्तसेवा

वणी : श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर भविष्यात भूकंपाच्या धक्क्याने, नैसर्गिक बदलांमुळे फनिक्यूलर रोप वे ट्रॉलीवर दरड आल्यास किंवा अन्य कारणांंनी ट्रॉलीस आग लागली, तर ट्रॉली व परिसरात अडकलेल्या भाविकांची सुटका कशी करता येईल, यासाठी नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून मॉकड्रील करण्यात आले. (Mockdrill from Nashik District Disaster Management Saptshringi Gad devotees experienced breathtaking demonstrations News)

मॉकड्रीलमध्ये पुणे येथील एनडीआरएफची टीम व धुळे येथील एसडीआरएफच्या टीमसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम, वैद्यकीय पथक, रोप वेचे तंत्रज्ञ व कर्मचारी, ट्रस्टचे आपत्ती व्यवस्थापन टीम, पोलिस पथक सहभागी झाले होते.

मदत कार्यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत, तहसील, पोलिस उपअधीक्षक कार्यालय, सुयोग गुरुबक्साणी फ्युनिक्यूलर रोप वे, सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट कार्यालय, सप्तशृंगी गड ग्रामपंचायत, आरोग्य विभाग यांच्यातील एकमेकांच्या समन्वयाची चाचपणी करण्यात आली.

प्रात्यक्षिकांदरम्यान रोप वे बोगीत अडकलेल्या भाविकांनी आपत्तकालीन दरवाजातून कसे बाहेर पडावे, दरड पडल्याने बोगी दाबली गेल्यास गॅस कटरचा उपयोग करून भाविकांना बाहेर कसे काढावे, अतिगंभीर जखमीस जागेवरच प्राथमिक उपचार करून मंदीर परिसरातून रोप वेच्या सहाय्याने खाली कसे आणावे.

जखमी भाविकांना खाली कसे उतरावे आदी संभाव्य परिस्थितीचे चित्तथरारक प्रात्यक्षिके एनडीआरएफ, एसडीआरएफ व आपत्ती व्यवस्थापनने केली. गडावर अचानक दाखल झालेले एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक, पोलिस, आरोग्य पथक, रुग्णवाहिका, सायरण आवाजामुळे ग्रामस्थ व भाविकांमध्ये भिती निर्माण झाली होती.

मात्र, मॉकड्रील असल्याचे कळाल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला. मॉकड्रील सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, पुणे येथील एनडीआरएफच्या ५ व्या बटालियनचे कमांडेेट, सेंकड कमांडेट अशोक कुमार, निरीक्षक इश्वरदास मते व १६ जवानांचे पथक, एसडीआरएफचे डीवायएसपी पारसकर, पोलिस निरीक्षक मनोज मोहड, तहसीलदार रोहिदास वारुळे, कळवणचे पोलिस निरीक्षक टेंबेकर,

वैद्यकीय अधिकारी अभय बंगाल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे नाशिक विभागप्रमुख देशपांडे, ट्रस्टचे नानाजी काकळीज, सुरक्षा अधिकारी यशवंत देशमुख, गुरुबक्सानी रोप वेचे प्रकल्प व्यवस्थापक राजीव लुंबा, सहाय्यक अनिल सोनवणे आदींंच्या उपस्थित झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT