Balasaheb Thorat Sakal
नाशिक

VIDEO : मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी - महसूलमंत्री थोरात

दत्ता जाधव


नाशिक : मोदी सरकारने सत्तेवर येताना मोठी आश्‍वासने दिली होती, परंतु त्यातील एकही आश्‍वासन गत सात वर्षांत पूर्ण झालेले नाही. केंद्रातील सत्तारूढ भाजप सरकार (Central Government) सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज (दि. ३०) केला. (modi government has failed at various issues said revenue minister balasaheb thorat)

काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, केंद्रातील सत्तारूढ मोदी सरकारच्या कारकिर्दीला सात वर्षे पूर्ण झाली. परंतु याकाळात त्यांनी सत्तेवर येताना दिलेल्या आश्‍वासनांपैकी एकही पूर्ण केलेले नाही. या सरकारने सत्तेवर येताना दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार, प्रत्येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख, शेतक-यांचे उत्पन्न दामदुप्पट, देशातील काळा पैसा परत आणणार, शंभर दिवसांत महागाई कमी अशी आश्‍वासने दिली होती परंतु ती सर्व फोल ठरली.


आंतरराष्टीय स्तरावर इंधनाच्या दरांत मोठी कपात होऊनही भारतात मात्र पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली असून डिझेलनेही नव्वदी पार केली आहे, याकडे लक्ष वेधत श्री. थोरात यांनी खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळेही गृहिणींचे बजेट कोलमडल्याचे सांगितले. नोटबंदी, जीएसटीयामुळे अर्थव्यवस्थेला घरघर लागलेली मागील सहा महिन्यांपासून मालकधार्जिणे कायदे तयार करण्यात आले असल्याकडे निर्देश करत देश केवळ एका माणसाच्या हुकुमाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीतील शेतकरी आंदोलन, कोरोनाचा प्रादुर्भाव याबाबत केंद्र सरकारने बेफिकीरी दाखविल्याचा आरोप करत आंतरराष्टीय पातळीवरही देशाची इभ्रत गेल्याचे त्यांनी सांगितले. आघाडी सरकारच्या स्थिरतेविषयी विचारले असता एका पक्षाच्या सरकारलाही अडचणी येतात, हे तर तीन पक्षांचे सरकार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्‍वर प्रकरणी अनभिज्ञ

मोदी सरकार गत सात वर्षात सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप थोरात यांनी केला. त्र्यंबकेश्‍वर येथील ब्रह्मगिरी डोंगरावरील वादग्रस्त खोद कामाबाबत पत्रकारांनी महसूलमंत्री म्हणून तुमची भुमिका काय असा प्रश्‍न केला असता हे प्रकरण आपल्याला आताच कळाल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत योग्य माहिती घेऊन कारवाई करू, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

काय म्हणाले थोरात

1) वादळात केंद्राची केवळ गुजरातला मदत
2) भाजप नेत्यांची महाराष्टाविषयी निष्ठा नाही
3) मराठा आरक्षणासाठी प्रयत्नशील
4) कोरोनानंतरची परिस्थिती पारदर्शी पद्धतीने हाताळल्याबद्दल डब्ल्यूएचओकडून कौतूक.
5) सात वर्षांत घटला विकासदर

(modi government has failed at various issues said revenue minister balasaheb thorat)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT