Molestation of a woman esakal
नाशिक

Nashik | वरिष्ठ व्यवस्थापकाकडून सहकारी महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कारखान्यातील व्यवस्थापकाने आपल्याच सहकारी महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केला.

सकाळ वृत्तसेवा

सातपूर (जि. नाशिक) : सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कारखान्यातील व्यवस्थापकाने आपल्याच सहकारी महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित महाव्यवस्थापक असून संबंधित महिला अधिकारीही याच कंपनीत कामाला आहे. (Latest marathi news)

संशयिताने फिर्यादी महिला गर्भवती असताना काम सोडण्याचा सल्ला दिला. परंतु, महिलेने काम सोडण्यास नकार दिल्यामुळे संतप्त संशयिताने महिलेस १७ मेस कंपनीतील केबिनमध्ये बोलावून घेतले व या महिला अधिकाऱ्याच्या खांद्यावर हात फिरवत विनयभंग केला. याच वेळी या महिला अधिकाऱ्याने हात झटकून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु, संशयिताने शिवीगाळ करत महिलेला दम दिला. यामुळे या महिलेने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मोतीवाला पाटील करत आहे.

औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यातील अनेक ठिकाणी विनयभंगासह विविध समस्यांना महिलांना तोंड द्यावे लागते. याबाबत संबंधित महिलेने तक्रार केल्यास तिला कामावरून कमी करण्याची धमकी दिली जाते. असे असताना शासनाने नेमून दिलेल्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी तयार केलेली समिती मात्र कागदावर आहे. याबाबत कामगार उपायुक्त कार्यालयाने लक्ष द्यावे, अशी मागणी महिला वर्गाने केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT