investment Google
नाशिक

लग्नात वाचलेला पैशांची नवविवाहितांच्या भविष्यासाठी गुंतवणूक

प्रकाश बिरारी

कंधाणे (जि. नाशिक) : राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत शासनाने ‘ब्रेक द चेन’च्या नियमांनुसार धार्मिक, सामाजिक व राजकीय कार्यक्रमांवर कठोर निर्बंध लागू केले असताना विवाहासाठी वऱ्हाडी मंडळींच्या संख्येची नाही, तर वेळेचीसुद्धा मर्यादा घालण्यात आली आहे. वधू-वरांच्या दोन्ही कुटुंबाकडून होणाऱ्या खर्चात मोठी बचत होत असून, तोच वाचलेला पैसा सुज्ञ पालकांनी नवविवाहितांच्या सध्याच्या किंवा भविष्यातील गरजेनुसार गुंतवणूक (Investment) करून नवीन आदर्श पायंडाच पाडला आहे. (money saved at the wedding during the corona is being invested for the future of the newlyweds)


नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालय, लॉन्समालक व वधू-वरांना प्रशासनाकडून दंड ठोठावण्याच्या शासनाने सक्त सूचना दिल्याने वारेमाप पैशांची उधळपट्टी करून धूमधडाक्यात होणारा लग्नसोहळा मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत साधेपणाने; परंतु विधिवत पार पाडले जात आहेत. शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातही विवाह सोहळे दिमाखात साजरे करण्याची व त्यासाठी अवाढव्य खर्च करण्याची जणू एक फॅशनच झाली आहे. त्यासाठी विशेषतः मुलींच्या पालकांकडून कर्ज काढून किंवा हातउसनवार आर्थिक तरतूद करून दागदागिने, कपडे, बॅंड, डीजे, मंडप रोषणाई, फटाके, वऱ्हाडींसाठी वाहन व्यवस्था व जेवणावळींवर अवाढव्य खर्च केला जातो. खास लग्नासाठी दूरवरून येणारे नातेवाईक, पाहुणे मंडळींचा प्रवासखर्च होत असतो. विवाहासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होणारा खर्च काही लाखांच्या घरात जातो. मात्र, वर्षभरापासून लग्नसराईच्या काळातच कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे राज्यात लॉकडाउन करण्यात आल्याने विवाहासाठी उपस्थितांची संख्या व वेळेचे बंधन आल्यामुळे वधू-वरांच्या दोन्ही बाजूंनी होणाऱ्या अनावश्यक खर्चाला आळा बसला आहे.


विविध रोजगारासाठी हातभार

वाचलेला पैसा सुज्ञ पालकांनी वधू-वरांच्या भविष्यातील गरज ओळखून शिक्षितांना नोकरी किंवा उच्चशिक्षणासाठी, नोकरीला आहेत त्यांना शहरात सदनिका किंवा प्लॉट खरेदी, व्यावसायिकांना गाळा, टपरी अन्यथा भागभांडवल, प्रवासी किंवा मालवाहतूक वाहन खरेदीसाठी दिला जात आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी व शेती करतात त्यांना फळबागायत, पॉलिहाउस उभारणीसाठी अर्थसहाय्य केले जात आहे. आवश्यकतेनुसार विहीर, पाइपलाइन, ट्रॅक्टर व औजारे खरेदी करणे, गरज नसेलच तर सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करून भविष्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करून बचतीचा पैसा सत्कारणी लावला जात आहे.



कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंधने असल्याने विवाह सोहळा मुहूर्तानुसार विधिवत पार पडत आहेत. त्यामुळे लग्नासाठी यजमान व आप्तेष्टांची होणारी ससेहोलपट थांबली असून, मानापानावरून होणारे रुसवे-फुगवे आणि त्यामुळे नातेसंबंधात येणारी कटुता, विवाहप्रसंगी मोठ्या प्रमाणात होणारी अन्नाची नासाडी थांबली आहे.
- डॉ. अभिमन बिरारी, निवृत्त प्राचार्य, कंधाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT