Maize and Onion Crop esakal
नाशिक

Monsoon Agriculture: मक्याचे क्षेत्र घटणार, कांद्याचे वाढणार! पावसाने उशीर केल्याने बदलली गणितं

भाऊसाहेब गोसावी

Monsoon Agriculture : जिल्ह्यात यंदा पाऊस जवळपास महिनाभर उशिरा आला. अजूनही जिल्ह्यातील अनेक गावांत पेरणीयोग्य पाऊस नाही. पावसाला झालेला उशीर, मका पिकासाठी लागणारा कालावधी अन् कांद्याला होणारी संभाव्य भाववाढ यामुळे या वर्षी जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र घटून लाल कांदा वाढणार आहे.

मागील वर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात ७२ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर मका पेरणी झाली होती. तर या वर्षी जुलैच्या ३ तारखेपर्यंत फक्त १८ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड झाली आहे. (Monsoon Agriculture corn area will decrease onion will increase Maths changed due to rain delay nashik)

जिल्ह्यात लाखो हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होते. त्यात प्रामुख्याने मका, तूर, मूग, बाजरी, सोयाबीन, भुईमूग आदी पिके घेतली जातात. प्रामुख्याने जिल्ह्याच्या चांदवड, देवळा, येवला, नांदगाव, मालेगाव, सिन्नर, सटाणा, कळवण या तालुक्यांत प्रामुख्याने खरिपाची पिके घेतली जातात.

यातील सिन्नर, चांदवड, येवला, नांदगाव, देवळा, मालेगाव या तालुक्यांतील बहुतांश शेती ही सिंचनाची सुविधा नसल्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. याच प्रमुख कारणामुळे मका पिकासह इतर खरीप हंगामातील पिकांचे क्षेत्र घटून लाल कांद्याचे क्षेत्र वाढण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मका पिकाला जवळपास चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागतो. अगोदरच पाऊस उशिरा आला. त्यात मका पिकाची पेरणी केली तर त्या क्षेत्रावर दुसरं पीक घेणं दुष्काळी भागात शक्य होत नाही.

त्यामुळे एकच पीक घेता येणार असले तर ते कांदा हेच घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. साठवण केलेला उन्हाळ कांदा यंदा जास्त दिवस टिकणार नाही, असा अंदाज आहे.

त्यामुळे कांद्याचे भाव वाढतील अशीच सर्वत्र चर्चा आहे म्हणूनच खरिपात लाल कांदा लागवडीकडेच कल आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील खरीप लाल कांद्याची लागवड होती जवळपास एकावन्न हजार हेक्टर, ती या वर्षी वाढून पाऊण लाख हेक्टरवर जाण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT