Nashik Monsoon Rain : इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मोसमी पावसाला सुरुवात झाली असून आज सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार कायम होती आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढला होता.
दरम्यान गेल्या ४८ तासात १०९ पावसाची नोंद घेण्यात आल्याची माहिती तहसीलच्या सूत्रांनी दिली. यात काल (ता.२७) ४८ तर आज ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. (Monsoon Rain Heavy rain in Igatpuri taluka Attendance for second day in row nashik)
हवामान खात्याने कालपासून अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्ह्यासाठी अलर्ट देण्यात आला आहे. तालुक्यात आज दुपारनंतर पावसाने पुन्हा जोर धरल्याने घोटी, इगतपुरी व ग्रामीण भागासह पाणलोट क्षेत्रांतही संततधार कायम होती.
या दोन- तीन दिवसात झालेल्या मोसमी पावसाने शेतीला दिलासा मिळत आहे. दरम्यान सर्वत्र पाऊस सुरू असला तरी अद्यापही वाकी, भाम या धरणातील साठा तळाशीच आहे.
भावली धरणात अवघा ५ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. दारणा धरणातही केवळ १३ टक्के जलसाठा आहे. तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधारमुळे जलसाठ्यात वाढ होण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
असा आहे बुधवारचा जलसाठा
भाम : ००
वाकीखापरी : ००
भावली : ०५
दारणा : १३
कडवा : १८
मुकणे : ३६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.