Nashik Rain Update : गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी दुपारी वरुणराजाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर सूर्यनारायणाने दर्शन दिले. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत शहरात ३०.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील मध्यम आणि मोठ्या २४ धरणांत सोमवारी (ता. २५)सकाळपर्यंत ८३ टक्के साठा झाला. पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गंगापूर, दारणा, नांदूरमध्यमेश्वरसह १४ धरणांमधून विसर्ग सुरू ठेवण्यात आला. (monsoon rain makes strong appearance in city on seventh day of Ganeshotsav 83 percent stock in dams nashik)
तालुकानिहाय झालेल्या पावसाची टक्केवारी अशी : मालेगाव- ६७.९, बागलाण- ७३, कळवण- ९६.७, नांदगाव- ६२.५, सुरगाणा- ७९.१, नाशिक- ६९, दिंडोरी- ११८.९, इगतपुरी- ५३.२, पेठ- ७३.५, निफाड- ७५.४, सिन्नर- ६२.८, येवला- ९१.६, चांदवड- ६९.७, त्र्यंबकेश्वर- ७३.७, देवळा- ७०.५. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ६६.९, धुळ्यात ७८.९, नंदुरबारमध्ये ७९, जळगावमध्ये ९२.७, नगरमध्ये ८२.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत काही मंडलांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये याप्रमाणे : मालेगाव- २८.३, करंजगव्हाण- १८.५, वीरगाव- २७.८, नांदगाव-३२, जातेगाव- १७, हिसवळ- २३.८, मनखेड- २३.५, सुरगाणा- २१, देवळाली- १५.३, शिंदे- ४०, ननाशी- ४९.५, इगतपुरी- २७.८, टाकेद- २१, जोगमोडी- ५३.८, करंजाळी- २४.५, रानवड- ३२, पांढुर्ली- १५.३, नायगाव- ४८.३, दिघवद- २३, वडनेर- १८.५, वडाळीभोई- ४८.
धरणातील विसर्ग
जिल्ह्यातील धरणातील विसर्ग क्यूसेसमध्ये असा : गंगापूर- १ हजार १५६, आळंदी- ३७, पालखेड- १ हजार ३११, करंजवण- १ हजार ३०३, वाघाड-३५५, पुणेगाव- ७५, दारणा- २ हजार ७०८, भावली- १३५, वालदेवी- २५, कडवा- ८२४, नांदूरमध्यमेश्वर- १० हजार २७२, चणकापूर- १ हजार ३२२, हरणबारी- ५२३, केळझर- ३०.
जिल्ह्यात पाच टँकरची भर
नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पाच टँकर वाढले आहेत. याशिवाय, जळगावात चार, साताऱ्यात दोन, सोलापूरमध्ये एक, छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन टँकर वाढले.
जिल्हानिहाय टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या पुढीलप्रमाणे असून (कंसात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या दर्शविते) : नाशिक- ९८- १४१ (८६), धुळे- १- ० (१), जळगाव- १३- ० (१३), नगर- ९३- ५४५ (९४), पुणे- ३९- २८९ (५१), सातारा- ९१-४३२ (९९), सांगली- ३१- २६७ (३७), सोलापूर- १४- १२७ (१६), छत्रपती संभाजीनगर- ४६- ८ (६१), जालना- २१- १७ (३६).
विभागनिहाय झालेला पाऊस
(आकडे टक्क्यांमध्ये दर्शवितात)
विभागाचे नाव यंदा आतापर्यंत गेल्या वर्षीचा
कोकण १०२ १०३.७
नाशिक ७४.७ ११२.९
पुणे ५८.९ ९४.८
छत्रपती संभाजीनगर ८२.१ ११४.८
अमरावती ८९.६ १२०.४
नागपूर १०१.८ १४४.५
राज्य ८९ ११६.१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.