Monsoon Tourism : अधिक मासाच्या महिन्याला असलेले धार्मिक महत्त्व आणि रिमझिम पावसाने निर्माण झालेले निसर्गसौंदर्य हे पर्यटकांना नाशिककडे आकर्षित करत आहे.
यातून सध्या शहरात पर्यटकांची मांदियाळी असल्याचे बघायला मिळते आहे. बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी होत असून, धार्मिक-निसर्ग पर्यटनाला चालना मिळते आहे. (Monsoon Tourism Rush of tourists in city Congestion at bus stand promotion of religious nature tourism nashik)
मंदिरांचे शहर, अशी ओळख असलेल्या नाशिककडे पर्यटकांची पावले वळत आहेत. अधिक मासानिमित्त गोदावरी पूजनाला असलेले महत्त्व लक्षात घेता रामतीर्थावर भाविकांची वर्दळ बघायला मिळते आहे.
खासगी ट्रॅव्हलपासून तर एसटी महामंडळाच्या बसगाड्यांनी भाविक प्रवासी शहरात दाखल होत आहेत. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नवीन सीबीएस, जुने सीबीएस यांसह मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानक आवारात गर्दी बघायला मिळते आहे.
खासगी वाहनांनी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. विशेषतः मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आदी राज्यांतून प्रवासी दाखल होत आहेत. यामुळे स्थानिक अर्थकारणालादेखील बुस्ट मिळतो आहे.
नाशिक दर्शनाला प्राधान्य
अधिक मासानिमित्त रामतीर्थावर दर्शनासाठी दाखल झाल्यानंतर बहुतांश भाविकांकडून नाशिक दर्शनाला प्राधान्य दिले जाते आहे.
यामध्ये पंचवटी आवारातील सीतागुंफा, काळाराम मंदिर, कपालेश्वर दर्शनासह तपोवन परिसराला भेट, सोमेश्वर, श्रीबालाजी मंदिराला भेट दिली जाते आहे. अनेक भाविक नाशिकमधील आपले विधी आटोपल्यानंतर त्र्यंबकेश्वरला आवर्जून भेट देत त्र्यंबकराजाच्या चरणी लीन होत आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
निसर्ग पर्यटणाचाही उत्साह
स्थानिक रहिवाशांकडून अन्य ठिकाणांहून येणाऱ्या पर्यटकांकडून ब्रह्मगिरी पर्वतरांगेला भेट देताना निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला जातो आहे. त्यातच रविवार सुटीचा दिवस असल्याने अनेक जण सहकुटुंब फेरफटका मारण्यासाठी निघाल्याने त्र्यंबक रोडवरील वाहनांची वर्दळ वाढलेली होती.
भाविक पर्यटक म्हणतात -
ईश्वर माहेश्वरी (मध्य प्रदेश) ः खूप दिवसांपासून नाशिकला भेट द्यायची होती. अधिक मासानिमित्त धार्मिक नगरीला भेट देण्याचे औचित्य आले. येथील वातावरण प्रसन्न करणारे असून, ऊर्जा निर्माण झालेली आहे.
निखिल पाटील (जळगाव) ः फिरण्यासाठी नाशिकला आलो होतो. एक दिवस अपुरा वाटत असल्याने आणखी दोन-तीन दिवस थांबण्याचा विचार आहे. मंदिरांसह येथील निसर्गाचे सौंदर्यदेखील अनुभवणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.