Weather forecast maps from July 25 to July 30 based on satellite observations have been prepared by meteorologists.  esakal
नाशिक

Nashik Monsoon Update : यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंतचा कठीण काळ; अभ्यासकांचा 2 ते 10 मिलिमीटर पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

Nashik Monsoon Update : मॉन्सूनच्या आगमनानंतर आतापर्यंत झालेल्या पावसाच्या आगमनाच्या आधारे नांदगाव, चांदवड, सिन्नरसह नाशिक तालुक्यासाठी आतापर्यंतचा कठीण काळ राहिला आहे.

हवामानशास्त्र अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यात २५ ते ३० जुलै या कालावधीत जिल्ह्यात २ ते १० मिलिमीटर पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामानात बदल झाल्यास त्यात बदल होऊ शकतो, असेही अभ्यासकांनी स्पष्ट केले.

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नगर जिल्ह्यांत गेल्या वर्षी २४ जुलैपर्यंत ३६९.८ मिलिमीटर पाऊस झाला होता. (Monsoon Update Meteorologists forecast 2 to 10 millimeters of rain in nashik news)

यंदा आज सकाळपर्यंत या जिल्ह्यातील सर्वसाधारण ३०८.९ मिलिमीटरपैकी २२४.४ मिलिमीटर म्हणजे ७२.६ टक्के पाऊस झाला आहे. नाशिक जिल्ह्यात ६३, धुळ्यात ८१.६, नंदुरबार ७८.१, जळगाव ९९.७, तर नगरमध्ये ६९ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये ५९, नाशिक ५१.६, सिन्नर ५०.९, चांदवड ४९.८ टक्के पाऊस झाला. गेल्या वर्षी नांदगाव तालुक्यात १४४, नाशिक १६१.२, सिन्नर १३२.६, चांदवड २१६.७ टक्के पाऊस झाला होता.

इतर तालुक्यांतील आज सकाळपर्यंतच्या पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून (कंसात तालुक्यात गेल्या वर्षी २४ जुलैपर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी दर्शविते) : मालेगाव- ८४.६ (१७७), बागलाण- ६८.३ (१८८.९), कळवण- ८६.६ (२४५.७), सुरगाणा- ८२ (१८९.४), दिंडोरी- ११०.३ (३१८.१), इगतपुरी- ५६.३ (७५.५), पेठ- ७८.३ (२२५.२), निफाड- ७६.१ (१९९.४), येवला- ७४.१ (१२८.२), त्र्यंबकेश्‍वर- ६०.१ (१३१.१), देवळा- ७१.६ (२०६.८).

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ही सारी परिस्थिती पाहता, पावसाने पाठ फिरविल्यास बागलाण, निफाड, येवला, देवळा तालुक्यातील स्थिती बिकट होण्याची शक्यता दिसते. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील सांगली, सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक होण्याची चिन्हे दिसत असताना येत्या चार दिवसांत या भागात पावसाची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र अभ्यासक सांगतात.

हवामानशास्त्र अभ्यासकांनी आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार नाशिक पट्ट्यात काही दिवसांत पावसाची फारशी प्रगती पाहावयास मिळत नसल्याचा अंदाज पुढे आला आहे. मुंबईकडून येणारा पाऊस इगतपुरीच्या पुढे, पुण्याकडून येणारा पाऊस संगमनेरच्या पुढे, छत्रपती संभाजीनगरकडून येणारा पाऊस येवला, मालेगावच्या पुढे सरकण्याची हवामानाची प्रगती दृष्टिक्षेपात दिसत नसल्याचा अंदाज आहे.

त्यामुळे स्वाभाविकपणे जिल्हावासीयांच्या काळजीचा घोर दिवसेंदिवस बळावत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, आज सकाळी संपलेल्या २४ तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : मालेगाव- ०.८, बागलाण- २.७, कळवण- १.९, नांदगाव- २.५, सुरगाणा- २२.५, नाशिक- ५.८, दिंडोरी- १३.३, इगतपुरी- ३०.७, पेठ- २४.३, निफाड- ५.४, सिन्नर- ५.२, येवला- ३.८, चांदवड- २.५, त्र्यंबकेश्‍वर- २५.९, देवळा- ०. तसेच नाशिक जिल्ह्यात ८.१, धुळ्यात ९.४, नंदुरबार ५.१, जळगाव ५.८, नगरमध्ये २.८ मिलिमीटर पावसाची २४ तासांत नोंद झाली आहे.

राज्यात ९७.७ टक्के पाऊस

(पावसाची आकडेवारी टक्क्यांमध्ये)

विभागाचे नाव आजपर्यंतचा पाऊस २३ ऑगस्ट २०२२ पर्यंतचा पाऊस

कोकण ११४.३ १०८.७

नाशिक ७२.६ ११९.७

पुणे ६२.२ ८६.१

छत्रपती संभाजीनगर ९१.६ १५८

अमरावती ११९.९ १३८.५

नागपूर १०३.२ १६०.८

राज्य ९८.७ १२६.९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT