NMC news esakal
नाशिक

NMC News : शहरात महिना अखेर स्वच्छता मोहीम; मंदिरांबरोबरच सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता

या मोहिमेअंतर्गत मंदिरांबरोबरच सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता महापालिका व महापालिकेला मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था करणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या दौऱ्यात श्री काळाराम मंदिरात स्वच्छता करण्याबरोबरच संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबविण्याची सूचना दिली होती. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने ३१ जानेवारीपर्यंत डीप क्लिनिंग मोहीम राबविण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिल्या असून त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे.

या मोहिमेअंतर्गत मंदिरांबरोबरच सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता महापालिका व महापालिकेला मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था करणार आहेत. (Month end cleanliness drive in city Cleanliness of temples well public places NMC News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील आठवड्यात नाशिकमध्ये आले होते. यावेळी मोदी यांनी येथील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता केली.

पंतप्रधानांच्या सेवाभाव वृत्तीमुळे महापालिका देखील खडबडून जागी झाली असून संपूर्ण शहरांमध्ये ३१ जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

या स्वच्छता मोहिमेला डीप क्लिनिंग असे नाव देण्यात आले असून आरोग्य विभाग वैद्यकीय विभाग बांधकाम विभाग असे एकूण जवळपास महापालिकेचे ४९ विभाग म्हणजेच संपूर्ण महापालिका स्वच्छतेच्या कामात लावली जाणार आहे.

मंदिरांबरोबरच सार्वजनिक रस्त्यांची व गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली जाणार आहे. मंदिरांकडे जाणारे रस्ते विशेष भाग म्हणून स्वच्छ केले जाणार आहे.

दुभाजकांमधील स्वच्छता वाहतूक बेटांमधील स्वच्छता देखील केली जाणार आहे. शहरात धूळ राहणार नाही अशा पद्धतीने स्वच्छता ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

सक्षम वाढ स्पर्धेत प्रभाग सात ची निवड

स्वच्छता संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धेची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने नाशिक महापालिकेने वॉर्ड क्रमांक सातची निवड केली आहे.

या स्पर्धेमध्ये प्रभाग सात मधील एकूण लोकसंख्या मुख्य रस्ते व छोटे रस्ते चौकांची संख्या, उद्याने, नाना नानी पार्क, जॉगिंग ट्रॅक व सायकल ट्रॅक रस्त्यांवरील झाडांचे प्रमाण, वॉटर फिल्टरेशन प्लांट मोठे व छोटे हॉटेल्स ची संख्या, हॉस्पिटल सार्वजनिक तसेच दैनंदिन स्वच्छता किती वेळा केली जाते.

या संदर्भातील माहिती, वॉल पेंटिंग प्रभागातील नागरिक कंपोस्टिंग करतात की नाही, नागरिकांमध्ये कचरा विलगीकरण करण्यासंदर्भात प्रबोधन करण्यात आले आहे की नाही, या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने मागवली आहे.

प्रभागात एकूण किती कचरा संकलित होतो. गार्डन वेस्ट डी ब्रिज हॉटेल वेस्ट करिता घंटागाडी आहे की नाही घंटागाडी कर्मचाऱ्यांची संख्या, अतिक्रमणे, कर वसुली संदर्भातील माहिती, ग्रंथालयांची संख्या, पुतळे व त्यांची सजावट, एकूण फेरीवाले क्षेत्र किती रिक्षा थांबव बस थांबा संख्या, कार्यरत बसेसची संख्या, गट शौचालय पुरुष व महिला यांचे सीट्स शौचालय, किती वेळा स्वच्छ केली जाते, वारसा स्थळे, भुयारी गटांवरील मॅन होल आधी संदर्भात माहिती मागण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT