अंबासन, (जि.नाशिक) : मोराणे सांडस (ता.बागलाण) येथील गावाला पाणीपुरवठा करणा-या पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळल्याने गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत सोशल मिडियावरून ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात खिल्ली उडवली जात आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाकडून तातडीने दखल घेऊन युध्दपातळीवर सदर टाकीचा स्लॅब टाकला जाईल असे सांगण्यात आले आहे. (Morane Sandus water tank slab collapsed trolling starts on social media Nashik News)
गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या टाकीचा स्लॅब गुरुवार (ता.५) रोजी दुपारी अचानक कोसळल्याने गावातील होणारा नळयोजनेतर्गंत पाणीप्रश्न उभा टाकणार असून ग्रामपंचायत प्रशासन याबाबत काय उपाययोजना करते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान एका व्हाटसपवर ग्रुपवर गावातील विकासात्मक कामाबाबत चांगलीच खिल्ली उडवली गेल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेऊन कर्मचाऱ्यांकडून टाकीचा कोसळलेला स्लॅबचा मलबा बाहेर काढून टाकी स्वच्छ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
गावाला तात्परत्या स्वरूपात पाणीपुरवठा करण्यासाठी गावातील दुस-या पाण्याच्या टाकीतून नळयोजनेतर्गंत पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली. मात्र जोपर्यंत सदर टाकीच्या स्लॅबचे काम नव्याने होत नाही तोपर्यंत गावकऱ्यांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
"टाकीचा स्लॅब कोसळताच सदर टाकीतील मलबा बाहेर काढून टाकी स्वच्छ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोसळलेल्या स्लॅबचे लवकरच नव्यानेच काम करण्यात येईल."
- गंगाधर शेवाळे, उपसरपंच मोराणे सांडस.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.