MSRTC News esakal
नाशिक

Free MSRTC Tour : केवळ 52 दिवसातच 1 कोटीहून अधिक ज्येष्ठांचा लालपरीतून मोफत प्रवास!

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना शिंदे-फडणवीस सरकारने २६ ऑगस्टपासून एसटी बसमध्ये राज्यात सर्वत्र मोफत प्रवास योजना सुरू केली आहे. शासनाचा निर्णय व लालपरीतील या प्रवासाला ज्येष्ठांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

राज्यातील ३१ विभागांतून केवळ ५२ दिवसांतच एक कोटी चार लाख ८६ हजार ८०९ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला. राज्यात रोज सरासरी दोन लाखांवर नागरिक ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ या योजनेचा प्रवास करून फायदा घेत आहेत. विरोधक व सोशल मीडियावर ट्रोल होणारी ही योजना ज्येष्ठांनी यशस्वी करून दाखविली आहे. (More than 1 Crore seniors travel for free MSRTC Bus in just 52 days Nashik Latest Marathi News)

योजनेमुळे ज्येष्ठांना दिवाळीत कुटुंबासह गावी, पर्यटन स्थळे, देवदर्शन यांसह नातेवाइकांकडे विविध ठिकाणी फिरायला जाण्यास मिळत आहे. यंदाच्या दिवाळीत हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ ऑगस्टला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ ही योजना जाहीर केली.

यामुळे राज्यात २६ ऑगस्टपासून लालपरीतून ज्येष्ठांना मोफत प्रवास लाभ मिळू लागला. राज्यात एसटी महामंडळाच्या १५ हजार ५०० बस रोज शहरासह ग्रामीण भागात धावतात. २४७ आगार व ५७८ बसस्थानके आहेत. या बसमध्ये ३० विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात ३३ टक्क्यांपासून ते शंभर टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते.

राज्यातील २९ लाख प्रवासी रोज एसटी बसमधून प्रवास करतात. त्यात दोन लाख ७५ वर्षांवरील ज्येष्ठांचा समावेश आहे. एसटी बस ही ज्येष्ठ नागरिक, शाळेतील मुले व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवास करण्याचे हक्काचे वाहन आहे. या योजनेमुळे ज्येष्ठांना पुणे, मुंबई, नागपूरसह मोठ्या शहरात दवाखाना व इतर कामांसाठी जाणे सोपे झाले आहे.

योजना ठरली वरदान

‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ ही योजना ज्येष्ठांना वरदान ठरली आहे. एसटी बसच्या राज्यातील २६ ऑगस्ट ते १६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जालना, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, गडचिरोली या ३१ विभागांतून तब्बल ५२ दिवसांतच एक कोटी चार लाख ८६ हजार ८०९ ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेत मोफत प्रवास केला आहे. या योजनेमुळे वृद्धांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त अशी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना जाहीर केली आहे. योजनेमुळे कुटुंबातील वृद्ध माता-पिता, आजी-आजोबांना पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी देता येत आहे. नातेवाईक, आप्तेष्ट व नातवंडांच्या भेटी होत आहेत." - दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

SCROLL FOR NEXT