Unseasonal Rain Damage : कृषीपंढरी नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षभरामध्ये अतिवृष्टी, सततचा पाऊस, अवकाळी पाऊस अन् वेगवान वाऱ्यासह गारपीट अशा नैसर्गिक संकटामुळे तीन लाख १३ हजार ३८० शेतकऱ्यांच्या तोंडचा ‘घास’ हिरवला गेला.
५ एप्रिल २०२२ ते ९ एप्रिल २०२३ या कालावधीत एक लाख ६१ हजार १४ हेक्टर क्षेत्राची दाणादाण उडाली आहे.
त्यात एक लाख नऊ हजार ८६८ हेक्टर जिरायत, तर ४५ हजार २७९ हेक्टर बागायती व पाच हजार ८६७ हेक्टर बहुवार्षिक पिकांखालील आहे. (More than 3 lakh farmers in the district have green grass Grain blown by unseasonal and hail Unseasonal Rain nashik news)
कृषी विभागाच्या अहवालानुसार एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत तीन लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या एक लाख ५१ हजार ५४६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यासाठी २५८ कोटी २५ लाख २३ हजार रुपयांच्या अनुदानाची मागणी सरकारकडे करण्यात आली.
७ ते ९ एप्रिल २०२३ या कालावधीत मालेगाव, बागलाण, नांदगाव, कळवण, देवळा, दिंडोरी, नाशिक, इगतपुरी, निफाड, सिन्नर, चांदवड तालुक्यांतील १४५ गावांमधील १३ हजार २८४ शेतकऱ्यांच्या आठ हजार ४६८ हेक्टरचे नुकसान झाले आहे.
त्यात सहा हजार ९२६ हेक्टर बागायती आणि एक हजार ५४२ हेक्टर बहुवार्षिक पिकांखालील क्षेत्र आहे. बागायती क्षेत्रातील पाच हजार ८१४ हेक्टर क्षेत्रावरील कांद्याचे सर्वाधिक क्षेत्र आहे.
याशिवाय गहू, हरभरा, मका, टोमॅटो, बाजरी, भाजीपाला, चारा, कांदा रोपे, वेलवर्गीय फळांचा बागायती क्षेत्रातील नुकसानीमध्ये समावेश आहे. बहुवार्षिक फळपिकांमध्ये ७५६ हेक्टर द्राक्षांचे, नऊ हेक्टर आंब्याचे, चार हेक्टर लिंबूचे, ७७४ हेक्टर डाळिंबाचे नुकसान झाले आहे.
वर्षभरातील नुकसानीची स्थिती
(बाधित गावे व शेतकऱ्यांची संख्या आणि बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये)
आपत्तीचा कालावधी तालुक्यांचे नाव गावे शेतकरी क्षेत्र
५ एप्रिल २०२२ नाशिक ३ १४ ७.०६
६ ते १० जून २०२२ नांदगाव, देवळा १० ३३ १५.०५
९ ते १६ जुलै २०२२ बागलाण, कळवण, देवळा, दिंडोरी, २८३ ४७५५ ११९८.५५
(अतिवृष्टी) सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, निफाड
९ ते १६ ऑगस्ट २०२२ मालेगाव, बागलाण, दिंडोरी, येवला ८९ १४,९९० ८८७७.८८
(अतिवृष्टी)
सप्टेंबर २०२२ मालेगाव, नांदगाव, नाशिक, इगतपुरी, ६७६ १,३३,९७० ६६७७३.३०
(अतिवृष्टी, सतत पाऊस) निफाड, येवला, चांदवड, सिन्नर, देवळा,
दिंडोरी, सुरगाणा
ऑक्टोबर २०२२ मालेगाव, नांदगाव, बागलाण, देवळा, ४११ १२,३३१ ६२५६.५५
(अतिवृष्टी, सतत पाऊस) नाशिक, कळवण, दिंडोरी, सुरगाणा,
निफाड, सिन्नर, येवला
५ ते ८ मार्च २०२३ कळवण, देवळा, दिंडोरी, नाशिक, २२४ ३९६५ १७५२.२९
(अवकाळी पाऊस) त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, निफाड, सिन्नर,
येवला
१५ ते १९ मार्च २०२३ बागलाण, नांदगाव, कळवण, देवळा, ५६० १८,९९० ७४२४.६०
(अवकाळी, गारपीट) दिंडोरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ,
इगतपुरी, निफाड, सिन्नर, चांदवड,
येवला
७ ते ९ एप्रिल २०२३ मालेगाव, बागलाण, नांदगाव, कळवण, १४५ १३,२८४ ८४६८.४९
(अवकाळी, गारपीट) देवळा, दिंडोरी, नाशिक, इगतपुरी,
निफाड, सिन्नर, चांदवड
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
सरकारची मार्चसाठी १७ कोटींची मदत
राज्यात ४ ते ८ आणि १६ ते १९ मार्च २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या दोन लाख २५ हजार १४७ शेतकऱ्यांच्या दोन हेक्टरपर्यंत एक लाख १३ हजार ४०२ हेक्टर ३७ आर क्षेत्रासाठी १७७ कोटी ३९ लाख रुपयांची मदत वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील घरांच्या पडझडीसाठी ३८ लाख २० हजार, सांगली जिल्ह्यातील पशूधनासाठी अडीच लाख असे ४० लाख ७० हजार रुपयांसह एकूण १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांची मदत दिली आहे.
त्यात नाशिक जिल्ह्यातील २२ हजार ९५६ शेतकऱ्यांच्या दोन हेक्टरपर्यंतच्या नऊ हजार १७६ हेक्टर ८९ आर बाधित क्षेत्रासाठीच्या १७ कोटी ३६ लाख ३६ हजार रुपयांचा समावेश आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.