unseasonal rain damaged crops esakal
नाशिक

Unseasonal Rain damage : उत्तर महाराष्ट्रातील 35 हजारांहून अधिक हेक्टरची धूळधाण!

महेंद्र महाजन

नाशिक : मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमध्ये उत्तर महाराष्ट्रातील ३५ हजार ६६७ हेक्टर क्षेत्राची या महिन्यातील नऊ दिवसांमध्ये धूळधाण झाली. त्यात नाशिक जिल्ह्यातील ११ हजार ७७५, जळगावातील दहा हजार ८७६, धुळ्यातील नऊ हजार ९६१, नंदुरबारमधील तीन हजार ६६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. याशिवाय नगर जिल्ह्यातील नऊ हजार ९६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची वाताहात झाली. (More than 35 thousand hectares of North Maharashtra Unseasonal Rain damage nashik news)

उत्तर महाराष्ट्रात या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात नाशिक जिल्ह्यातील बागलाण, कळवण, देवळा, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, निफाड, सिन्नर, चांदवड, येवला, दिंडोरी, नांदगाव, पेठ या आणि धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर, धुळे या, तर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर,

अक्कलकुवा, शहादा, तळोदा, अक्राणी, जळगाव जिल्ह्यातील जामनेर, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, चोपडा, जळगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, पारोळा, अमळनेर आणि नगर जिल्ह्यातील राहुरी, नेवासा, अकोले, कोपरगाव, श्रीगोंदा, नगर, पाथर्डी, जामखेड, श्रीरामपूर, संगमनेर, राहाता या तालुक्यांतील शेतकऱ्यांना फटका बसला.

गहू, भाजीपाला, मका, आंबा, कांदा, हरभरा, द्राक्षे, बाजरी, ज्वारी, डाळिंब, पपई, केळी, टरबूज, खरबूज, सूर्यफूल, लिंबू, टोमॅटो, झेंडू, संत्रा, ऊस, चिकू उत्पादकांना आर्थिक नुकसानीच्या झळा बसल्या.

नाशिकसाठी अडीच कोटींची मागणी

नाशिक जिल्ह्यात ५ ते ८ मार्च यादरम्यान झालेल्या ३३ टक्क्यांवरील नुकसानीतील बाधित क्षेत्र एक हजार ७४७ हेक्टर असून, हे नुकसान ३२३ गावांमधील तीन हजार ९४६ शेतकऱ्यांचे झाले आहे. या नुकसानीपोटी अपेक्षित निधी दोन कोटी ५८ लाख ८५ हजार रुपये असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून सरकारला पाठविण्यात आला आहे.

त्यात कोरडवाहू क्षेत्रातील एका शेतकऱ्याचे ०.४० हेक्टर, तर बागायती क्षेत्रातील सिंचनाच्या दोन हेक्टरपर्यंतच्या दोन हजार ९९४ शेतकऱ्यांचे एक हजार २३१ हेक्टर आणि बहुवार्षिक बारमाही फळपिकांखालील ९५१ शेतकऱ्यांचे ५१५ हेक्टरचा समावेश आहे.

या शिवाय १५ ते १९ मार्च यादरम्यान नाशिक जिल्ह्यातील सात हजार ७२० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात बागायती क्षेत्रातील कांद्याचे तीन हजार ५०२, कांदा रोपांचे ५१०, मक्याचे २.८०, ज्वारीचे ०.४०, गव्हाचे एक हजार ५२९, टोमॅटोचे १४, हरभऱ्याचे ४२.५०, भाजीपाल्याचे ३७८, इतर फळपिकांचे १३.५०, वेलवर्गीय फळांचे दोन अशा एकूण पाच हजार ९९४ हेक्टरचा समावेश आहे. याशिवाय त्यात बहुवार्षिक फळपिकाखालील क्षेत्रामध्ये द्राक्षांचे ७६८, आंब्याचे ९०४, डाळिंबाचे ५५ असे एकूण एक हजार ७२७ हेक्टर समाविष्ट आहे.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

धुळे जिल्ह्यात पंचनामे

धुळे तालुक्यातील ४२२ आणि शिरपूर तालुक्यातील २५.९५ अशा एकूण ४४७.९५ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. हे नुकसान १५ व १६ मार्चचे आहे. शिवाय शिंदखेडा तालुक्यातील याच कालावधीतील २०० हेक्टरच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.

धुळे तालुक्यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित क्षेत्र १६९.१०, तर साक्री तालुक्यात ६०१.७० व ३३ टक्क्यांपेक्षा कमी बाधित क्षेत्र ८८ हेक्टर क्षेत्र आहे. शिवाय शिंदखेडा तालुक्यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित क्षेत्र ८५ हेक्टर इतके आहे.

(बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये, गावे व शेतकऱ्यांची संख्या दर्शवते)

दिवस जिल्ह्याचे नाव बाधित क्षेत्र बाधित शेतकरी बाधित गावे

४ ते ७ मार्च नाशिक ४१५४.८४ ५,५६३ २६३

धुळे ८१५५.९० १०१०८ १४९

नंदुरबार १७५३.४० २८१५ २३२

जळगाव ८९६६.०३ १३३५४ २५१

नगर १८४१ ४६०० १३१

एकूण उत्तर महाराष्ट्र २४८७१.१७ ३६४४० १०२६

१५ व १६ मार्च नाशिक ११९.८० २२२ ४०

धुळे ८६१ १५१५ ५६

नंदुरबार १३.२० ३४ १२

जळगाव ५६२.५० ६२६ ४६

नगर १० १ १४

एकूण उत्तर महाराष्ट्र १५६६.५० २३९८ १६८

१७ ते १९ मार्च नाशिक ७५००.२३ २०५५९ ३५६

धुळे ९४३.८० २२०२ २९

नंदुरबार १२९९ १७८४ ९२

जळगाव १३४७.४७ १९९१ ६४

नगर ७८४१ १४७८५ १२८

एकूण उत्तर महाराष्ट्र १८९३१.५० ४१३२१ ६६९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT