Nashik News : नांदूरमध्यमेश्वर धरणातून आज सकाळपर्यंत यंदाच्या पावसाळ्यात आठ हजार ८६५ दशलक्ष घनफूट म्हणजेच ८.८६ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी रवाना झाले आहे.
जिल्ह्यातील मध्यम आणि मोठ्या एकूण २४ धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी कमी म्हणजे, ८० टक्के साठा झाला. (More than fifty nine TMC of water for Jayakwadi from Nandur Madhyameshwar Nashik News)
धरणातून आतापर्यंत सोडण्यात आलेले पाणी दशलक्ष घनफुटांमध्ये असे : दारणा- ६ हजार ५२९, गंगापूर- ६४४, कडवा- ८४०, भोजापूर- २९, आळंदी- ५४, वालदेवी- २२६. असे एकूण आठ हजार ३२२ दशलक्ष घनफूट म्हणजे, ८.३२ टीएमसी पाण्याचा विसर्ग धरणांमधून झाला आहे.
गंगापूर धरण समूहात सद्यस्थितीत ९०, पालखेड समूहात ९४, ओझरखेड समूहात ८०, दारणा समूहात ९३, गिरणा खोऱ्यात ६० टक्के साठा आहे.
तिसगावमध्ये ३०, गिरणामध्ये ५३ टक्के पाणी उपलब्ध आहे. आळंदीमधून ८०, पालखेडमधून २१८, वाघाडमधून २५६, दारणातून ५५०, भावलीतून ७३, वालदेवीमधून १८३, नांदूरमध्यमेश्वरमधून ८६०, चणकापूरमधून ८५३, हरणबारीमधून ८४६, केळझरमधून १९८ क्यूसेस विसर्ग सुरू आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कालव्यातून वापरासाठी विसर्ग (आकडे दशलक्ष घनफुटांमध्ये)
० गोदावरी उजवा- १ हजार १३
० गोदावरी डावा- ६०७
० जलद- १ हजार १७९
० नाशिक डावा- १२९
० कडवा उजवा- ४३९
० भोजापूर डावा- ३
० एकूण- ३ हजार ३७०
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.