नाशिक :पालकमंत्री दादा भुसे यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या ‘मॉडेल स्कूल’प्रकल्पातंर्गत जिल्हयातील शाळांची निवड अखेर निश्चित झाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या शाळांना मान्यता घेण्यात आली. जिल्हयात तालुकानिहाय विचार केला असता, सुरगाणा व मालेगाव तालुक्यातील सर्वाधिक प्रत्येकी ९ तर, देवळा तालुक्यातील ४ शाळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सुरगाणा तालुक्यातील ज्या गावांनी गुजरात राज्याला जोडण्यात यावे अशी मागणी केली होती, त्या गावांमधील शाळांचा यात समावेश आहे. (Most Model School in Malegaon Surgana Nashik Latest Marathi News)
जिल्हा परिषदेच्या १०० शाळांची निवड करुन ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित करण्याची संकल्पना पालकमंत्री दादा भुसे यांनी मांडली. जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी मॉडेल स्कूल साकारण्यास मान्यता देत या उपक्रमाचा शुभारंभ देखील केला होता. या उपक्रमातंर्गत निवड केलेल्या शाळांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून संरक्षण भिंत बांधण्यासह १२ प्रकराच्या सुविधा पुरविल्या जाणार आहे.
याशिवाय ग्रंथालय, हेल्थ केअर सेंटर, चांगली इमारत, विद्यार्थ्यांना ड्रेस कोड, कलादालन, टॅबलेट, खेळण्यासाठी क्रीडांगण असायला हवे यासह विद्यार्थ्यांच्यादृष्टीने सर्वांगिण विचार करत या मॉडेल स्कूल साकारल्या जाणार आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना योगाचे धडे देखील दिले जाणार आहेत. या शाळांचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील इतर शाळा त्यांचे अनुकरण करतील, असा मुख्य हेतू यामागे आहे. यासाठी जिल्हाभरातील १०० शाळांची निवड केली करण्याचे निश्चित झाले होते.
हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....
या १०० शाळांची यादी निश्चित करतांना गत महिनाभरापासून शिक्षण विभागाची चांगलीच दमछाक झाली. निश्चित झालेल्या शाळांमध्ये वारंवार बदल सुचविला जात होता. त्यामुळे शाळांची निवड होण्यास विलंब होत असल्याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिध्द केले होते. यानंतर, दोन दिवसात शाळांची यादी निश्चित झाली आहे. निश्चित झालेल्या तालुकानिहाय शाळांना सोमवारी (ता.१२) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
तालुकानिहाय शाळा
चांदवड (५), देवळा (४), दिंडोरी ८), कळवण (७), पेठ (६), सुरगाणा (९), नाशिक (५), नांदगाव (६), सिन्नर (६), निफाड (६), इगतपुरी (७), येवला (६), त्र्यंबकेश्वर (८), बागलाण (८), मालेगाव (९).
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.