MPSC Crack By Aditya Thackray esakal
नाशिक

Motivational Story : पिंपळगावच्या आदित्यची विक्रीकर निरीक्षकपदाला गवसणी

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : कष्ट, जिद्द व मेहनतीच्या जोरावर पिंपळगाव बसवंत येथील आदित्य चंद्रभान ठाकरे या तरुणाने विक्रीकर निरीक्षकपदाला गवसणी घातली आहे. रोज दहा ते बारा तास अभ्यास करून आदित्यने एमपीएससी परीक्षेतील पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील आदित्यच्या यशाचा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

आदित्यचे वडील चंद्रभान ठाकरे पिंपळगावच्या वाघ महाविद्यालयात परिचर पदावर, तर आई भारती ठाकरे ‘मविप्र’च्या अभिनव बालविकास मंदिरात शिक्षिका आहेत. सामान्य कुटुंबातील आदित्यने बारावीला विज्ञान शाखेत ८० टक्के गुण मिळवून आपले ध्येय निश्चित केले.

अविनाश धर्माधिकारी, विश्‍वास नागरे-पाटील यांना आदर्श ठेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उतरायचा ध्यास त्याने घेतला. लक्ष्य कठीण होते; पण कठोर परिश्रमाच्या बळावर आदित्यने दृढ निश्चिय केला. (Motivational Story Aditya of Pimpalgaon is promoted to post of sales tax inspector Clear MPSC Exam in First Attempt Dream of becoming a collector Nashik News)

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Aditya Thackray With Family

आदित्यचे प्राथमिक शिक्षण पिंपळगावच्या जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण पिंपळगाव हायस्कूल, बीएसस्सी पदवी नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयात पूर्ण करतानाच एमपीएससीचा अभ्यासही सुरू ठेवला. आदित्यच्या घवघवीत यशाने ठाकरे कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

अभ्यास ठेवणार सुरू

आदित्यला त्याचे बारावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. त्यासाठी त्याने बारावीनंतर सीईटी परीक्षासुद्धा दिली नाही. तब्बल दहा ते बारा तास रोजची अभ्यासासाठीची बैठक असायची. चाणक्षबुद्धी व आकलन शक्तीमुळे आदित्यचा अभ्यास फळाला आला. २०२१ मध्ये पहिल्यांदाच दिलेल्या एमपीएससी परीक्षेचा निकाल घोषित झाला. राज्य विक्रीकर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी तो महाराष्ट्रात अनुक्रमे २७ व १३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. राज्य विक्रीकर निरीक्षकपदावर त्याची नेमणूक होणार आहे. अभ्यास सुरूच ठेवून जिल्हाधिकारी पदाला विराजमान होण्याचे आदित्यचे स्वप्न आहे.

"आदित्यने घेतलेल्या यशाचे आज चीज झाले. तहान, भूक विसरून त्याने एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळविले. त्याच्या यशाचा आनंद शब्दात सांगता न येणारा आहे."

-चंद्रभान ठाकरे, आदित्यचे वडील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT