corona warriors esakal
नाशिक

कोरोनात काम केलेले वाहन चालक- मालक बिलांसाठी झिजविताहेत पोलिसांचे उंबरठे

प्रमोद सावंत

मालेगाव : शहरात कोरोना (Corona) संसर्गाचा उद्रेक झाला असताना जीव धोक्यात घालून हॉटस्पॉट (Hotspot) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात २२ वाहन मालक- चालकांनी (Drivers) जीव धोक्यात घालून काम केले. लॉकडाऊन (Lockdown) काळात पोलिस बंदोबस्त, वाहतूक, डब्यांची ने- आण, किराणा साहित्य पोहोचविणे, गस्त घालणे, पेट्रोलिंग, रेल्वे पोलिस वाहतूक, पोलिसांचे वास्तव्य असलेल्या मंगल कार्यालयात साहित्य पोहोचविण्यासह विविध कामांसाठी पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेने २२ वाहने अधिग्रहीत केली होती. कोरोना रुग्ण शहरातून हद्दपार झाले असताना आणि तिसरी लाट उसळली असतानाही तब्बल अडीच वर्षे उलटूनही या वाहन चालक- मालकांना त्यांचे हक्काचे सुमारे साडेतेरा लाख रुपये अद्यापही मिळालेले नाहीत. हे बील मिळावे यासाठी चालक- मालक गेली दोन वर्षे पोलिसांचे उंबरठे झिजवत अर्ज- निवेदने करीत आहेत. (Motorists working in Corona scrambling for bills to police Nashik News)

शहर वाहतूक शाखेने वाहने अधिग्रहीत केल्यानंतर त्यांच्याकडून विविध कामे करुन घेण्यात आली. शहरात या काळात विविध जिल्ह्यातून बंदोबस्त आला होता. प्रशासनाला बंदोबस्ताला आलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांची भोजन, पाणी, निवास, शौचालय यासह सर्वच व्यवस्था करावी लागली. त्यांच्यासाठी प्रामुख्याने ही वाहने वापरण्यात आली. प्रसंगी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना ने- आण करण्यासाठी देखील या वाहनांचा वापर झाला. कोरोनाकाळात वाहनांना इंधन शासनाकडून पुरविण्यात आले होते. इंधनाचा खर्च वजा जाता २२ वाहन चालकांचे पोलिस प्रशासनाकडे १३ लाख ५९ हजार रुपये घेणे आहे. या वाहनधारकांना वाहने अधिग्रहीत करताना चार ते सहा महिन्यात तुमची बिले मिळतील असे सांगण्यात आले. या काळात बिकट परिस्थिती होती. सामाजिक सेवा सौदार्ह वाढीस लागले होते. त्या पार्श्‍वभूमीवर वाहनचालकांनीही आढेवेढे न घेता वाहने दिली. आता मात्र पैसे मिळविण्यासाठी त्यांना पोलिसांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. पैसे मिळविण्यासाठीची कसरत पाहून वाहनधारकांवर आता ‘हेची फळ काय मम तपाला’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

बीले थकीत असलल्या वाहन चालक- मालकांनी पोलिसांना प्रारंभी अर्ज केली. नंतर अर्ज, लेखी निवेदन, वरिष्ठ अधिकाऱ्यांना साकडे घातले. जिल्हा पोलिस अधिक्षक, उपअधिक्षक आदींना निवेदने सादर केली. पोलिस प्रशासनातर्फे कोरोना संसर्गात बंदोबस्त कामे, अधिग्रहीत वाहनांची नोंद करत बिलांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठविला आहे. अद्यापही बिले प्राप्त न झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. बीले न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

"शहर वाहतूक शाखेने वाहने अधिग्रहीत केली. माझी टेम्पो ट्रॅव्हलर अधिग्रहीत झाल्यानंतर ३६ दिवस वापरण्यात आली. पोलिसांनी शासकीय नियमानुसार तासाप्रमाणे होणारे भाडे गृहीत धरुन बिलाचा प्रस्ताव पाठविला आहे. आपले स्वत:चे सुमारे दोन लाख रुपये बील येथे थकबाकी आहे. मी कर्ज काढून वाहन घेतले आहे. हक्काचा पैसा मिळेनासा झाल्याने आर्थिक विवंचना वाढली आहे. पोलिसांनी अग्रक्रमाने हा प्रश्‍न सोडवून थकीत बिले अदा करावीत अशी अपेक्षा."

- गणेश सावंत, वाहन मालक, मालेगाव

पोलिसांनी अधिग्रहीत केलेली वाहने

कार- १२

टम्पो ट्रॅव्हलर व बस - १०

एकूण वाहने - २२

एकूण रक्कम थकीत - १३ लाख ५९ हजार ६२५ रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT