नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी बॉम्बे) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. (MoU was signed between Maharashtra University of Health Sciences Nashik and IIT bombay nashik news)
सहयाद्री अतिथीगृहात विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारारावर कुलगुरु निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजींचे संचालक डॉ. सुभाषिश चौधरी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ आदी उपस्थित होते. या करारांतर्गत विविध सहयोगी उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी ठोस उपाय योजना व कार्यप्रणाली विकसित करण्यात येईल.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
सामंजस्य करार हा भविष्यात आरोग्य आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये एकत्रित संशोधन व आरोग्य सुविधा डिजिटल हेल्थ यांचा विकास संशोधन याच्यामध्ये एक लौकिक अर्थाने भर टाकणारा आहे. या कराराची दोन्ही बाजूने प्रभावी अंमलबजावणी होण्याकरता नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहेत.
आयआयटीच्या वतीने डॉ. गणेश रामकृष्णन आणि डॉ. क्षितिज जाधव प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. प्रशासकीय विभागामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव अजित सासूलकर तसेच कक्ष अधिकारी प्रियंका कागिनकर, विद्यापीठाचे विधी अधिकारी संदीप कुलकर्णी, विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ नितीन कावडे, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र विभागाचे समन्वयक संदीप राठोड तसेच विद्यापीठाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचे विभाग प्रमुख संजय पिसाळ आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.