dr bharati pawar Google
नाशिक

जिल्हा परिषद सदस्या ते केंद्रीय मंत्री; भारती पवार यांचा प्रवास

एस. डी. आहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : सतत समाजाच्या संपर्कात, प्रवाहात राहिले तर राजकारणात अशक्य काहीच नसते. कधी-कधी तर ध्यानीमनी नसतानाही छप्पर फाडके मिळते, तेही राजकारणातच. दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांचा जिल्हा परिषद सदस्या ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा असाच आहे. (bharti pawar's journey from zilla parishad member to union minister)


खासदार होण्यासाठी पहिल्या अपयशाने न खचता जनसंपर्कात सातत्य ठेवले. २०१९ च्या निवडणुकीत उमेदवारीचे गणिते बदलली. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी राहिलेल्या डॉ. भारती पवार यांना भाजपची उमेदवारी बहाल झाली. तब्बल पावणेदोन लाख मताधिक्याने त्या खासदार झाल्या. पक्षाने दिलेले उपक्रम यशस्वी राबविले. समाजाशी नाळ घट्ट ठेवली. भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून त्यांची शिफारस झाल्याचे बोलले जाते. डॉ. पवार यांना सासरे ए. टी. पवार यांच्याकडूनच राजकीय बाळकडू मिळाले. दोन वेळा जिल्हा परिषद सदस्यत्व भूषविणाऱ्या डॉ. पवार या तशा मितभाषी अन्‌ अभ्यासूही आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अपयश आल्यानंतरही त्या मतदारसंघातील समाजकारणात सक्रिय राहिल्या. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची उमेदवारी माजी आमदार धनराज महाले यांच्या पारड्यात पडली. तीनदा खासदार राहिलेले हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या उमेदावारीला भाजपने कात्री लावली. अशा नाट्यपूर्ण घडामोडींनंतर डॉ. पवार यांना भाजपची उमेदवारी मिळाली. अर्थात, राष्ट्रवादीने उमेदवार बदलण्यात पवार घराण्यातील राजकीय कुटुंबकलह व जाऊबाई जोरातचे राजकारण कारणीभूत होते, असे बोलले जाते. पंतप्रधान मोदी लाट व डॉ. पवार यांच्याविषयी मतदारसंघात राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने सहानुभूती यामुळे तब्बल पावणेदोन लाख मतांनी त्यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली. राजकारणात कर्तृत्वाबरोबर नशिबाची जोड लागते. बहुधा राष्ट्रवादीने डॉ. पवार यांची उमेदवारी कापत भाजपचा मार्ग दाखवत खासदारकी अन्‌ मंत्रिपद अप्रत्यक्षरीत्या बहाल केले. कारण, दोन वर्षांपूर्वीच्या मोदी लाट व पिंपळगावची टर्निंग पॉइंट ठरलेली ऐतिहासिक सभा भाजपचाच उमेदवार दिंडोरी मतदारसंघातून विजयी होणार, हे निश्‍चि‍त होते.


पक्षाने दिलेले उपक्रम राबविल्याची पावती

पक्षसंघटन व भाजपच्या उपक्रमाकडे कानाडोळा करण्याची घोडचूक व सर्वपक्षीय संबंध असल्याचा देखावा उमेदवारी कापली गेल्याने माजी खासदार चव्हाण यांना भलताच महागात पडला. तेच हेरत खासदार डॉ. पवार यांनी गेल्या सव्वादोन वर्षांत भाजपच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोचविल्या. कोरोना काळात उद्‌भवलेल्या द्राक्ष उत्पादकांच्या समस्या केंद्र सरकारपर्यंत पोचविल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चांगले संबंध राखले. त्यातूनच त्यांचा पक्षश्रेष्ठींच्या गुडबुकमध्ये समावेश झाला अन्‌ आश्‍चर्यकारकरीत्या केंद्रीय मंत्रिपदावर त्या विराजमान झाल्या.



विकासातून दिसावी पॉवर

दिंडोरी मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून एकदाही येथील खासदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही. मंत्रिपदाचा हा वनवास डॉ. पवार यांच्यासारख्या उच्चशिक्षित लोकप्रतिनिधीने संपविला. विकासाचा मोठा बॅकलॉग मतदारसंघात आहे. रस्ते, पाणी असे प्रश्‍न ‘जैसे-थे’ आहेत. जनतेच्या अपेक्षा आता उंचावल्या आहेत. डॉ. पवार यांच्या मंत्रिपदाच्या पॉवरमधून विकासाची किरणे मतदारसंघात यावीत, अशी अपेक्षा आहे.

चांदवड वगळता बहुतांश तालुक्यांत भाजपची पक्षसंघटनेची वाढ खुंटली आहे. पक्ष उभारणीलाही बळ मिळणार आहे. मोदींची लोकप्रियता घसरू लागल्याने चिंतेत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साहाला उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

Maharashtra Winter Update: थंडीपासून जरा जपूनच, निच्चांकी तापमान 10 अंशांवर; राज्य गारठलं!

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

SCROLL FOR NEXT