sakal-news-impact esakal
नाशिक

Sakal Impact : उसळविक्रेता समर्थच्या कुटुंबाला खासदार कोल्हेंचे निमंत्रण; आगळ्यावेगळ्या मदतीची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (जि. नाशिक) : अवघ्या १३ व्या वर्षी उसळ विकून कुटुंबाला आधार देणाऱ्या समर्थ ईश्‍वर जाधवचा संघर्ष मांडणारे ‘चिमुकल्या समर्थच्या खांद्यावर कुटुंबाचे ओझे’ या मथळ्याखाली वृत्त ‘सकाळ’(Sakal) मध्ये २ मार्चला प्रकाशित झाले होते. (MP Kolhe invitation to family of usal seller Samarth for help after news published by sakal newspaper nashik news)

त्याची दखल घेत खासदार अमोल कोल्हे यांनी समर्थच्या कुटुंबाला कोल्हापूर येथे सुरू असलेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यासाठी विशेष आमंत्रण दिले आहे. त्यानुसार समर्थच्या आत्या शैला शिंदे यांच्यासह जाधव कुटूंब गुरूवारी (ता.६) सायंकाळी कोल्हापूरसाठी रवाना झाले.

समर्थ सध्या महापालिकेच्या पाथर्डी येथील शाळा क्रमांक ८३मध्ये इयत्ता आठवीत शिकत आहे. त्याचे शिक्षक जयदीप पाटील आणि सविता खैरनार या वेळी उपस्थित होते. शुक्रवारी (ता. ७) सादर होणाऱ्या महानाट्याच्या प्रयोगादरम्यान खासदार कोल्हे समर्थला आगळी-वेगळी मदत करण्याची शक्यता आहे. समर्थचे वडील संधीवात आणि मधुमेहाने पीडित असून, आईदेखील मूक बधीर असल्याने त्यांच्या हाताला काम मिळणे अशक्य आहे.

तर, कंबरेची शस्रक्रिया झाल्याने समर्थची आजीदेखील घरातच असते. तर लहान भाऊ स्वामी हा इयत्ता सातवीत शिकत आहे. अशा या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी समर्थ रोज चार तास सायकलवर फिरून मिसळ विकतो.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

त्याच्या या संघर्षाची कहानी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर नाशिक शहर आणि जिल्ह्यातील दादा पाटील मंडपवाले, वसंत पाटील, जितेंद्र चोरडिया, श्री गुरुजी रुग्णालय, रोटरी क्लब, कमलाकर भामरे, सुनील केदार, किरण सोनार आदींनी त्याच्या घरी भेट देऊन किराणा सामान, धान्य, वडिलांचा आणि आजीचा औषधांचा खर्च, शैक्षणिक साहित्य आदी बाबींची जबाबदारी घेतली.

तसेच, ‘सकाळ’चे पुणे येथील विशेष प्रतिनिधी संतोष शाळीग्राम यांच्यामार्फत ही बातमी खासदार कोल्हे यांच्यापर्यंत पोचल्यानंतर त्यांनी आपले सहकारी गोकुळ पाटील यांच्यामार्फत या कुटुंबाला कोल्हापुर येथे आमंत्रित केले आहे. त्यामुळे खासदार कोल्हे यांच्या मनात नेमके काय आहे, हे उद्या कळणार आहे. दरम्यान, हे सर्व ‘सकाळ’मुळे शक्य झाले असून, आम्ही ‘सकाळ’चे कायम ऋणी राहु, अशा भावना समर्थच्या आजी पुष्पाबाई यांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT