नाशिक : न्यायदानाची भूमिका ज्याला बजावयाची आहे, तोच न्यायमूर्ती आरोपीला भेटण्यासाठी जात असेल, त्याच्याकडून न्यायाची काय अपेक्षा करणार, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी करताना देशाची न्यायव्यवस्था अत्यंत गंभीर अवस्थेत पोहोचली असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान धोक्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला. (MP Sanjay Raut statement Judiciary system of country in very serious state nashik political)
नाशिक दौऱ्यावर आलेले खासदार राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने ज्या न्यायमूर्तींवर न्याय देण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली तो न्यायमूर्ती उठतो, गाडीत बसतो व आरोपीच्या घरी जातो.
आरोपीसोबत चहापान करतो व पुन्हा हसत हसत बाहेर पडतो, ही या देशाच्या न्यायव्यवस्थेची अवस्था आहे. लोकसभेबाबत आमच्या चर्चा मुंबईत होतात; पण काँग्रेसचे हायकमांड दिल्लीत आहे.
त्यामुळे काँग्रेस नेत्यांना दिल्लीत जाव लागते, असे सांगत शिंदे गट आणि अजित पवार गटाचे हायकमांडही दिल्लीत आहे. शिंदे व अजित पवार गटाने ४८ जागा लढवाव्यात, त्यांना त्यांची जागा कळेल, अशी टीका राऊत यांनी केली.
यांच्या गळ्यात दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे. मानेवर पट्टा असेल तर तो आजार आहे. असा आजार कुणालाही होऊ शकतो. अमित शाहदेखील आजारी असतात. नरेंद्र मोदी आजारी पडू शकतात. पण तुमच्या गळ्यात जो दिल्लीच्या पट्टा आहे.
तो महाराष्ट्राला वेदना देणारा आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा बांधलाय. दिल्ली त्यांना खेळवतेय. देवेंद्र फडणवीस यांच्या कट्यारच्या विधानावरही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.
त्यांना २०२४ नंतर नाटकं हेच करायचं आहे, त्यांना दुसरं काम काय आहे? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा वाचावा. सत्य हा पुरावा आहे.
संघ परिवार जर सत्य हा पुरावा मानत नसतील, तर त्यांनी कबर खोदावी. त्यांना काय पुरावे हवे आहे? उद्या तुम्ही म्हणाल तुम्ही मराठे असल्याचे पुरावे द्या, अशी टीका राऊत यांनी केली.
प्रकाश आंबेडकर अकोल्यातून...
वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असून, वंचित बहुजन आघाडीसुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे. लोकसभेच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे.
अकोला लोकसभेची जागा परंपरेनुसार प्रकाश आंबेडकर लढतात व ती जागा त्यांनीच लढावी. यावर महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे.
महाराष्ट्रातील आंबेडकरी विचारांची जनता ही कोणत्याही परिस्थितीत आंबेडकरांच्या संविधानाची नासधूस करून राज्य करणाऱ्या मोदींना पाठिंबा देणार नाही, असा विश्वासही खासदार राऊत यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.