Yogesh Chavanke, father Sudhakar Chavanke, mother Manda Chavanke, who worked as a security guard in a farmer's family in Gonde and Sinnar, was convicted. esakal
नाशिक

PSI Success Story: गोंदेच्या जिगरबाज युवकाची थक्क करणारी किमया! फौजदारच्या यशाला मेहनतीची सोनेरी झालर

सकाळ वृत्तसेवा

दत्ता खुळे : सकाळ वृत्तसेवा

PSI Success Story : आयुष्यात यशस्वी होताना अन् कॅरिअर वाटा तुडवताना माणसांत जिगर पाहिजे. पण ह्या संघर्षाच्या वाटा सोप्या नसतात. खुप सत्व परिक्षेतून पुढे जावे लागते. घरच्या आर्थिक स्थिती ने सिक्युरिटी गार्ड चे काम हाॅटेल मध्ये केले.

घरी गायी गोठ्यामध्ये जनावरांचे संगोपन करून दूध काढले. अन् हा जिगरबाज पट्ट्या चक्क फौजदार झाला आहे. ‌गोदे (ता.सिन्नर) येथील योगेश सुधाकर चव्हाणके ह्या जिगरबाज युवकांची किमया थक्क करणारी ठरली आहे. (MPSC PSI Success Story of yogesh chavanke amazing alchemy of energetic youth of Gonde nashik)

जे काही परिश्रम कष्ट केले. त्याचं आज सोनं झाले आहे. सोनेरी यशाला संघर्षाची मोठी झालर आहे. गोंदे (ता.सिन्नर ) येथील बहुचर्चित समुध्दी मार्गांच्या केंद्र ठिकाणी शेतकरी सुधाकर चव्हाणके आहे.

घरी अवघी दोन बिघे शेती थोरला मुलगा रामदास फौजदार योगेश यांच्या सह दोन मुली असा परिवार आहे. घराच्या स्थिती मुळे थोरला मुलगा रामदास मुसळगाव औद्योगिक वसाहतीत चहाची टपरी चालवितो.

योगेशने दहावी नंतर सिन्नर काॅलेजला बी एस्सी पुर्ण केले. शिक्षण करताना पोट भरावा लागते हे काॅलेज जीवनात अनुभव घेतला.2015 ला अशोका बिल्डिंग ग्रुप च्या प्रतिक हाॅटेल मध्ये रात्रीच्या वेळेस सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

त्यांनी ती स्विकारली. रात्र पाळी करणे अन् सकाळी काॅलेज ही दिनचर्या ठरलेली. घरी शेतकरी कुटुंब असल्याने थोरला भाऊ टपरी दुकान संभाळले. त्यामुळे गायी गोठ्यामध्ये जनावरांचे संगोपन करून त्यांना चारा वैराण करणे रात्रीं वेळेस काम जाताना दुभत्या जनावरांचे दूध काढणे हे काम नित्यनेमाने केले.

दोन वर्षांच्या करोना कालावधी सिक्युरिटी गार्ड काम सुटलं. 2016 ला बी एस्सी पुर्ण होताना जालना च्या पोलिस उपनिरीक्षक शुभम कोरडे ह्या मित्राने योगेश ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा दे असे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

येथून योगेशच्या कष्टाच्या चाकेला बळ मिळाले.2021ला पुण्यात स्पर्धा परिक्षेचे क्लासेस केले.सहा महिन्यात पुन्हा सिन्नर गाठले. कोविड काळात बंद केले सिक्युरिटी गार्ड काम चांगले असल्यामुळे मुसळगावच्या सोलेर ऊर्जा प्लॅन मध्ये योगेश काम करू लागला.

पण लोकसेवा आयोगाच्या परिक्षा चा हट्ट सोडला नाही. गोंदे मुसळगाव अन् सकाळी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या लोकनेते अभ्यासिका हा प्रवास सुरू ठेवला. सिक्युरिटी गार्डच्या नाईट कामांचा फायदा झाला.

त्यात फौजदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. ह्या जिगरबाज योगेश संघर्ष पाहून गोंदेकरांच्या प्रत्येक कुटूंबात जणू आपण फौजदार झाले असे मानात योगेश परिवार कौतुक सुरू आहे.

"आई वडीलांनी तुला जे करायचे ते काम कर असे सांगितले.मनातील मोठी जिद्द ठेऊन यश मिळविले आहे.सिक्यूरिटी गार्ड नाईट कामाने अभ्यास वेळ मिळाला आहे.मेहनत कामाने सोनेरी क्षण दिला." - योगेश सुधाकर चव्हाणके, गोंदे.

"शेती आहे पण पाणी नसल्याने फारसे उत्पन्न येत नाही.योगेश ने जिद्द ने नाव कमावले.गायींचे सेवा काम धंदा करून अभ्यास केला.त्याच्या फौजदार झाल्याने आम्ही भारावून गेलो आहे" -

- मंदा सुधाकर चव्हाणके, योगेशची आई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT