दत्ता खुळे : सकाळ वृत्तसेवा
Success Story : कॅरिअर वाटा निवडताना हल्ली पालक असो की पाल्य यांचा गोंधळ उडत असतो. त्यात गुणवत्ता धारक विद्यार्थी असेल व्यावसायिक वाटा कडे प्रत्येकाचा कौल असतो. मॅकेनिकल्स इंजिनिअर होऊन ती साईड सोडून चक्क फौजदार झाला आहे. (MPSC Success Story engineer from small village became first PSI in sulewadi at sinnar nashik)
सुळेवाडी (ता.सिन्नर )ह्या छोट्या गावात वैभव बाळासाहेब गुंजाळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परिक्षेत यश मिळून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. वैभवचं वैभवशाली यश गुंजाळ परिवार अन् सुळेवाडीकरांसाठी आहे.
वैभव हा इंजिनिअर असताना नौकरी न करता स्वतः बळावर फौजदार झाला आहे. विशेष म्हणजे कोणतेही अॅकेडमी व महागडे क्लासेस न करता घरी अन् मित्रांसोबत राहून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाले आहे.
सुळेवाडीचे स्व.बाळासाहेब किसन गुंजाळ यांचा थोरला मुलगा वैभव आहे. गुंजाळ परिवाराला सुळे वाडीच्या डोंगराळ भागात जेमतेम शेती आहे. शेतकरी कुटुंबातील कष्ट करी गुंजाळ परिवार आहे. 2019 ला वडीलांचे आकस्मित निधन झाले.
ह्या शेतकरी कुटुंबातील सर्व जबाबदारी आई मनिषा गुंजाळ यांनी उचलली. थोरल मुलगा बारागांवपिंप्रीला दहावीच्या परीक्षेत 90 टक्के गुण मिळवून गुणवत्ता सिद्ध केली. कुटुंबाच्या आर्थिक स्थिती मुळे संगमनेर ला जाऊन मॅकेनिकल्स इंजिनिअर साईट घेतली. त्यात वैभव यशस्वी झाला.
पण मनात दहावी पासून पोलीस वर्दीची चालू लागली होती. तोच मार्ग निवडून यश मिळण्याचा निश्चित केला. मात्र करोना महामारी संकट पुढे आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
वैभवने घरी राहून शेती व्यवसाय सांभाळून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. आई मनिषा ने लहान मुलगा भुषण पुण्यात यु पी एस सी ची तयारी करण्यासाठी पुण्याला पाठविले आहे. गुंजाळ भावंडांची बहिण उषा इंजिनिअर पुण्यात नोकरी करते.
तीन मुलांना आई मनिषा गुंजाळ ने मोलमजुरी करून शिकवले. मुलांनी स्वबळावर कॅरिअरच्या वाटा शोधल्या आहे. आज वैभव ने स्वतः मनाप्रमाणे वाटा निवडून फौजदार झाला आहे. सुळेवाडी सारख्या छोट्या गावात वैभवने कमाल केली. पहिला फौजदार होण्याचा मान मिळवला आहे.
"मला लहान पणापासून पोलिस वर्दीची आवड अन् आकर्षण होते. घराच्या स्थिती मुळे इंजिनिअर झालो. पण मन रमले नाही.माझ्या यशात आईचा वाटा आहे. "
- वैभव बाळासाहेब गुंजाळ, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, पोलीस उपनिरीक्षक, सुळे वाडी
मुलांना पुस्तके घेण्यासाठी पैसे नव्हते. वैभवने कोणतेही हट्ट केला नाही. मोलमुजरी करून कष्ट केले. सप्नात देखील वाटलं नव्हतं वैभव फौजदार होईल. त्याने केलेल्या कष्टाला फळ आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.