mpsc success story Rohit Sable has qualified for post of Forest Range Officer nashik news esakal
नाशिक

MPSC Success Story : रोहितची वनपरिक्षेत्र अधिकारी पदाला गवसणी; 6 महिन्यापूर्वी विक्रीकर निरीक्षकपदीही निवड

सकाळ वृत्तसेवा

MPSC Success Story : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत दहिंदुले (ता. सटाणा) येथील रोहित साबळे यांने वनपरिक्षेत्र अधिकारी पदाला गवसणी घातली आहे.

सहा महिन्यापूर्वी रोहितची विक्रीकर निरीक्षकपदी देखील निवड झाली होती. अवघ्या सहा महिन्यातच रोहितने अभ्यासाच्या जोरावर दोन मोठ्या पदांना गवसणी घातली आहे. (mpsc success story Rohit Sable has qualified for post of Forest Range Officer nashik news)

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे रोहित एसएससी ॲग्रीचे शिक्षण घेत असताना कुतूहलाने त्याने एक स्पर्धा परीक्षा दिली अन् या क्षेत्राकडे आकर्षित झाला. यशाचा पाठलाग करत सहा महिन्यातच 'एमपीएससी'तून दोन पदे संपादन केली.

विक्रीकर निरीक्षक परीक्षेत अनुसूचित जमाती मधून राज्यात ६ क्रमांक तर वनसेवा परीक्षेत रोहित ने राज्यामध्ये अनुसूचित जमाती मधून ३ रा क्रमांक पटकावला आहे. कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा क्लास न करता स्व: कष्टाने, सहकारी व वरिष्ठांच्या मदतीने हे यश संपादन केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा मध्ये पहिल्याच प्रयत्नात राज्यकर निरीक्षक (STI) पदी निवड झाली आहे.

"ग्रामीण भागातील बहुतांश मुलांना स्पर्धापरीक्षा विषयी माहिती झाली आहे. परंतु, स्पर्धा परीक्षेत म्हणावे तसे अपेक्षित यश सहजासहजी मिळत नसल्याने बरेचजण हताश होऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणे सोडून देतात.

स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल, तर त्यासाठी अभ्यासामध्ये सातत्य, मेहनत या गोष्टी महत्त्वाच्या आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सोबतच करिअरच्या दृष्टीने प्लॅन बी तयार ठेवणे देखील तितकेच गरजेचे आहे." - रोहित साबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT