MSRTC 192 employees on duty in Yeola depot 90 buses run daily Nashik news esakal
नाशिक

Nashik | येवला आगाराची उत्पन्नाची गाडी रुळावर!

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) येवला आगारात (Yeola Bus depot) आजअखेर १९२ कर्मचारी कामावर हजर झालेले असल्याने आगाराच्या दिवभरात ९० च्या आसपास बसफेऱ्या दररोज धावू लागल्या आहेत. यामुळे आगाराचे दिवसभराचे सुमारे दोन ते सव्वा दोन लाखाचे उत्पन्न सुरळीत झाले आहे. पुणे, औरंगाबाद, शेगावसह ग्रामीण भागातील मुक्कामी बस देखील सुरळीत झाल्या आहेत.

नगर-धुळे व नाशिक-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या येवला आगारात वर्दळ मोठी असते. तशा येथे फक्त महिना-दीड महिना बस बंद होत्या. जिल्ह्यात सुरुवातीपासून कामावर हजर होणाऱ्यांची संख्या येथे जास्त असल्याने नाशिक मार्गावर गेल्या दीड-दोन महिन्यांपासून बस सुरूच होत्या, असे असले तरी इतर सर्व बस बंद असल्याने आगाराची यंत्रणा काही अंशी ठप्प होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सर्व काही पुन्हा सुरळीत होऊन बस मार्गावर धावू लागल्या आहेत. येथील आगारात एकूण २३३ कर्मचारी असून यातील आजपर्यंत १९२ जण हजर झाले आहेत. यामध्ये ७२ चालक, ६६ वाहक तर यांत्रिकी विभागाचे १७ कर्मचाऱ्यांचा व प्रशासकीय १४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संप काळात बडतर्फ करण्यात आलेल्या ३५ जणाच्या बाबतीत अजून निर्णय झालेला नसून त्यांनी विभाग नियंत्रकाकडे यासंदर्भात अपील दाखल केले आहे. ते वगळता उर्वरित सर्व जण रुजू झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांनी दिली.

येथील आगाराच्या ४० बस असून यातील सुमारे ३८ बस धावू लागल्या आहे. दिवसभरात ९० च्या आसपास फेऱ्या होत आहे. यात नाशिकसाठी २३, औरंगाबादला ५, पुणे, शेगाव, नांदगाव आदी मार्गावरही फेऱ्या सुरू झाल्या आहेत. कुसुर, कुसमाडी, रहाडी या ग्रामीण भागातील मुक्कामी बस देखील सुरू झाल्याने प्रवाशांची गैरसोय हळूहळू दूर होऊ लागली आहे. यांत्रिकी विभागाचे कर्मचारी टप्प्याटप्प्याने रुजू होत असल्याने नादुरुस्त असलेल्या बसची दुरूस्ती करून काम करून त्याही सुरू होत आहेत.

उत्पन्न आले रुळावर
आगाराला यापूर्वी दिवसाला सरासरी चार ते पाच लाख रुपयाचे उत्पन्न मिळत होते. सध्या बस सुरळीत होऊ लागल्याने हा आकडा दोन ते सव्वा दोन लाखापर्यंत पोचला आहे. अनेक मार्गावर बस सुरळीत झाल्या, की यात नक्कीच वाढ होईल असा आशावाद प्रशासनाला व कर्मचाऱ्यांना आहे. सध्या शाळाही बंद असून उन्हाची तीव्रता वाढत असल्याने प्रवाशांची संख्या मर्यादित असली तरी सुट्ट्या सुरू होत असल्याने पर्यटनाच्यादृष्टीने अनेकजण फिरू लागल्याने प्रवासी हळूहळू वाढतील असा विश्वासही व्यक्त होत आहे. एकूणच बहुतांशी बस सुरू झाल्याने शहरासह तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय दूर होत आहे. आगार प्रशासनही वर्दळीच्या मार्गावर प्राधान्याने बस सुरळीत करण्याच्या प्रयत्नात आहे.

"नेहमीप्रमाणे बहुतांशी मार्गावर टप्प्याटप्प्याने बस सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ३५ बडतर्फ कर्मचाऱ्यांचा निर्णय बाकी असून इतर सर्वजण रुजू झाले आहेत. सर्वांना त्यांची जबाबदारी सोपविली आहे. बस सुरळीत होत असल्याने प्रवाशांनीही आता पुन्हा प्रवासासाठी बसचा वापर करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी आपले स्मार्ट कार्ड नूतनीकरण करून घ्यावे, विद्यार्थ्यांचे पास देखील सुरू झाले आहेत."
- प्रशांत गुंड, आगार व्यवस्थापक, येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

Bandra East Assembly Constituency Results: 'मातोश्री'च्या अंगणात पुन्हा शिवसेना? वरुण सरदेसाई यांनी मारली मुसंडी; झिशान सिद्दीकी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT