Deputy General Manager Maind, Department Controller Arun Sia etc. felicitated Manager Prashant Gund for achieving the target in Diwali income. esakal
नाशिक

MSRTC Income During Diwali : दिवाळीच्या कमाईत लालपरी सुसाट!

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : ऑक्टोबर महिन्यात जोडून आलेल्या सुट्या, दिवाळीचा सण येथील एसटी आगाराला चांगलाच पावला आहे. दिवाळीच्या दहा दिवसांत तब्बल ५४ लाख ५१ हजार, तर दिवाळीपासून आजपर्यंत तब्बल ७० लाखांची कमाई आगाराने केली आहे. विशेष म्हणजे, नाशिक जिल्ह्यात येथील आगाराने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे. (MSRTC Income During Diwali Yeola depot To district income 70 lakhs Nashik News)

तब्बल पाच महिन्यांहून अधिक काळ एसटी आंदोलनामुळे ठप्प होती. त्यानंतर बस सुरू झाल्या; परंतु प्रवाशांचा हळूहळू प्रतिसाद मिळत गेल्याने एसटीला पूर्वीचे दिवस कधी येणार, याकडे लक्ष लागून होतेच. कोरोनाचे सावट सावरल्यानंतर आलेली यंदाची दिवाळी अखेर एसटीला पावली असून, येथील आगाराने व्यवस्थित नियोजन करून वर्दळीच्या मार्गावर फेऱ्या सुरू केल्याने उत्पन्नात झटपट श्रीमंत होण्यास आगाराला यश आले आहे.

सुटीत आपापल्या गावी व पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात नियमित बस फेऱ्यांबरोबरच दिवाळी स्पेशल जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. दिवाळीच्या काळात दर वर्षी प्रवासीदरात दहा टक्के हंगामी दरवाढ केली जाते. या दरवाढीनंतरही प्रवाशांनी आपल्या लालपरीवर म्हणजेच एसटीवर विश्वास दाखवत प्रवास केला. नागरिकांनी एसटी महामंडळाने सोडलेल्या जादा गाड्यांचा लाभ घेत आपल्या इच्छितस्थळी प्रवास केला. २१ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान सोडलेल्या जादा गाड्यांद्वारे राज्यात चार कोटी ९५ लाख प्रवाशांनी केलेल्या प्रवासाच्या माध्यमातून २७५ कोटींचा महसूल मिळाला आहे.

वर्दळीच्या मार्गावर नियोजन केल्याने व कर्मचाऱ्यांनी देखील मेहनतीने साथ दिल्याने २१ ते ३१ तारखेदरम्यान येथील आगाराने शिर्डी, नगर, पुणे, औरंगाबाद, नाशिक या मार्गांसह ग्रामीण भागातील विविध मार्गांवरही बसफेऱ्या चालविल्या. या काळात दैनंदिन चालनीय २०० पेक्षा अधिक फेऱ्या चालविण्यात आल्या व ३९ नियते चालविण्यात आली. तर दिवाळी जादा बसही दोन हजार किलोमीटरपर्यंत चालविण्यात आल्या. दिवाळी काळात आगाराच्या बस एक लाख ४८ हजार ८६८ किलोमीटर चालून ९० हजार प्रवाशांनी प्रवास केला. यामध्यमातून ५४ लाख ५१ हजारांची कमाई झाली आहे. तर २१ तारखेपासून आजपर्यंत ७० लाख ६० हजारांचे उत्पन्न मिळाल्याचे आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी सांगितले.

कौतुकाची थाप!

राज्य परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक श्री. मैंद, तसेच नाशिक विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी येवला आगारास भेट दिली. दिवाळीत जादा वाहतूक कालावधीत आगाराने नाशिक विभागात उद्दिष्टेप्राप्तीमध्ये एक नंबर मिळविल्याबद्दल कौतुक केले. तसेच आगारप्रमुख यांचा सत्कार केला. याच कालावधीत उत्कृष्ट उत्पन्न आणणारे चालक, वाहक व उत्कृष्ट कामगिरी करणारे कार्यशाळा अधीक्षक, सर्व यांत्रिकी कर्मचारी यांना देखील गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

उत्सवकाळातील दरवाढ मागे

एसटी महामंडळाच्या वतीने उत्सवकाळासाठी १९ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत नियमित प्रवास भाड्यात १० टक्के वाढ केली होती. मात्र १ नोव्हेंबरपासून लागू केलेली दरवाढ मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा प्रवाशांना पूर्वीच्या दराने प्रवास करता येणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून, अजूनही सुट्या असल्याने प्रवाशांची गर्दी टिकून आहे.

"नाशिक, औरंगाबाद, पुणे, नगर, तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची पसंती येथील आगारातून मिळाली आहे .दिवाळीनिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी पुन्हा एसटीला पसंती दर्शविली अन् आगाराने योग्य नियोजन केल्याने आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे प्रवाशांना चांगली सेवा देता आली आहे. यामुळेच उत्पन्नात जिल्ह्यात आम्ही बाजी मारू शकलो."

-प्रशांत गुंड, आगारप्रमुख, येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT