नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळातील अभ्यासमंडळाचा निकाल जाहीर केला आहे. काल (ता.२०) रात्री उशिरापर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. (MUHS Election Health University Board Result Announced nashik news)
विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी निवडणूक निकाल जाहीर केला. विजयी उमेदवारांचे विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी अभिनंदन केले.
डॉ. बंगाळ म्हणाले, की विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीत अभ्यासमंडळाकरीता पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेतील प्रि-क्लिनिकल मेडिसिन विभागात गणेश घुगे, सुधा करुडकर, बाबासाहेब माळी, सुनीता निघुटे, सुषमा पांडे, स्वप्ना पराते यांची बिनविरोध झाली.
अभ्यासमंडळासाठी पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेतील पॅरा-क्लिनिकल मेडिकल विषयातून अभिजित अवारी, संजयकुमार मोरे या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. क्लिनिकल मेडिकल सब्जेक्ट मेडिसिन व अलाईड सब्जेक्टकरिता विठ्ठल धडके, आरती किणीकर, सचिन मुंबरे, शेखर प्रधान, प्रवीण सोनी या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.
क्लिनिकल विषयातील सर्जरी व अलाईड विषयाकरीता गिरीशचंद्र बारटक्के, राजेश डेरे, हेमंत गोडबोले, प्रशांत हिप्परगेकर, पुष्पा जुंघारे, मारुती लिंगायत हे उमेदवार विजयी झाले. पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेत सुपरस्पेशालिटी विद्याशाखेतील मेडिसिन व अलाईड विषयासाठी श्रीरंग बिचु दामोदर यांची तर सर्जरी व अलाईड सब्जेक्टसाठी उमेश ओझा यांची बिनविरोध निवड झाली.
पदवी व पदव्युत्तर दंत विद्याशाखेतील प्रि-क्लिनिकल विषयासाठी राजेश गोंधळेकर, दीपक नागपाल, संगीता पळसकर, दिनेश राजपूत, सतीश संकपाळ, संजय सरोदे या सहा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. दंत विद्याशाखेच्या क्लिनिकल (दंत) विषयाकरीता विभा हेगडे, कांतिलाल काकडे, रितेश कळसकर, वीरेंद्र केरुडी, पुरुषोत्तम राखेश्वर, जगदीशचंद्र वठार हे सहा उमेदवार विजयी झाले.
हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
पदवी व पदव्युत्तर आयुर्वेद विद्याशाखेच्या प्रि-क्लिनिकलसाठी नीलेश बकळ, अभय भुसकाडे, लक्ष्मीकांत जोशी, प्रवीण पेटे, राजेश सवाई, पंकज विश्वकर्मा विजयी झाले. आयुर्वेद विद्याशाखेच्या पॅरा-क्लिनिकलसाठी समीर बेलोरकर, प्रशांत भोकरधनकर, अरुण दुधमल, अविनाश जगताप, प्रवीण जोशी व प्रमोद खोब्रागडे विजयी झाले. क्लिनिकल विषयातील शल्यतंत्र व अलाईड विषयासाठी रुजुता डुबे, दत्तात्रय लोडे, अनंतकुमार शेकोकर, रविदास मोरे, सुरेश पोधडे, स्वाती उबरहंडे विजयी झाले.
क्लिनिकल विषयातील कायाचिकित्सा व अलाईड विषयासाठी सचिन चंडालीया, अर्चना दाचेवार, राजेश गिरी, मिहीर हजरनवीस, वैभव फरताळे, नितीन जाधव विजयी झाले.
पदवी व पदव्युत्तर होमिओपॅथी विद्याशाखेच्या प्रि-क्लिनिकल विषयातील होमिओपॅथीसाठी मनोज आरोसकर, शिवाजी बनसोडे, रत्नेश्वर धानुरे, मानसी जतकर, परिमल जोशी, वंदना शागा विजयी झाले.
पॅरा-क्लिनिकल विषयातील होमिओपॅथीसाठी सुनील बन्ने, प्रताप भोसले, सीताराम डोळे, अजित फुंडे, मनीष इनामदार, मोरेश्वर कुलकर्णी विजयी झाले. क्लिनिकल होमिओपॅथी विषयासाठी आशिष भगत, कांचन देसरडा, सूर्यकांत गिते, अजय काळे, सुजाता कमिरे, प्रसाद करमकर विजयी झाले.
पदवी व पदव्युत्तर विद्याशाखेतील तत्सम विद्याशाखेतील ॲक्युपेशनल थेरपी व फिजीओथेरपीसाठी प्राजक्ता पाटील, पल्लवी येलर्थी यांची बिनविरोध निवड झाली. पदवी व पदव्युत्तर नर्सिंग विद्याशाखेसाठी विश्वनाथ बिरादार, बाळासाहेब घुले, विशाल नैकारे, राजेश श्रीलेखा, गजानन वाळे, प्रवीण घोलप विजयी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.